नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

वीज कोसळून तीन जनावरांचा मृत्यू — शेतकऱ्यांनी घ्यावी खबरदारी

Nandgaon news

 


वीज कोसळून तीन जनावरांचा मृत्यू — शेतकऱ्यांनी घ्यावी खबरदारी

वेगवान मराठी :  मारुती जगधने

” दिनांक 12 ऑक्टोबर २०२५ ”

टापरगाव (ता. कन्नड) —परतीचा पावसाळा देखील शेतकऱ्यांचा पाठलाग सोडायला तयार नाही या परतीच्या पावसामध्ये विजांच्या कडकडा  मध्ये छत्रपती संभाजी नगर मधील कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याच्या तीन पाळीव प्राण्यांचा वीज पडून मृत्यू झाला या घटनेने सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे

टापरगाव येथे आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळून श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल मोतिंगे या शेतकऱ्यांच्या तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोतिंगे यांच्या शेतात जनावरे चारण्यासाठी सोडली असताना अचानक वीज कडाडून मोठा आवाज झाला आणि तिन्ही जनावरे जागीच मृत पडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रतिनिधी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला.

या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे की, वादळी पावसाच्या काळात जनावरे सुरक्षितपणे गोठ्यात बांधून ठेवावीत. तसेच वीज कडकडत असताना शेतात किंवा मोकळ्या जागेत जाणे टाळावे.

या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईचा अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!