अबब…..आग्रा महामार्गावर ट्रकभर टोमॅटो मालाची लूट; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२२ ऑक्टो २०२५ : – नॅशनल हायवेवरील शिरवाडे वणी शिवार परिसरात ट्रक अडवून टोमॅटो माल जबरदस्तीने नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंतपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजु सखाराम जोगदंडकर वय ३९, रा. वैष्णवी देवी अपार्टमेंट, सुरेश नगर, मुंब्रा देवी कॉलनी, दिवा पूर्व, ठाणे यांनी १ लाख ५० हजार रुपयांचा एकूण ६७६ कॅरेट, प्रत्येकी २५ किलो वजनाचा टोमॅटो माल एच.आर ७४ एल.बी ५५१३ या ट्रकद्वारे पाठविला होता.
दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ८ वाजेच्या दरम्यान, ट्रक भारत पेट्रोल पंप, दौलत हॉटेलजवळ, शिरवाडे वणी शिवार येथे थांबविण्यात आला. आरोपी राहुल भाउसाहेब बस्ते, वय ३६, रा.वडनेर भैरव, राहुल गांगुर्डे, रा. संतोषी माता नगर,पिंपळगाव बसवंत व अशोक बाबुराव ढोमसे, वय ५२, रा.गोरठाण यांनी संगनमताने ट्रक अडवून चालक आणि त्याच्या सोबत्यास दमदाटी केली. आरोपींनी, सदर माल अशोक ढोमसे यांचा आहे, तोपर्यंत पैसे मिळेपर्यंत ट्रक सोडणार नाही असे सांगत जबरदस्तीने टोमॅटो माल उतरवून नेला अशी राजु जोगदंडकर यांनी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे फिर्यादीवरून पिंपळगाव ब.पोलीस ठाण्यात गु. रं. नं.२९०/२०२५, भारतीय दंड संहिता कलम ३०९(४), १२६(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोहवा हेंबाडे करीत आहेत.



