लोकल बातम्या

प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला प्रकरणी येवल्यात सकल मराठा समाजाने केले निषेध आंदोलन

प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला प्रकरणी येवल्यात सकल मराठा समाजाने केले निषेध आंदोलन

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला/ दिनांक: 14 जुलै 2025/

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा येवला येथे सकल मराठा समाज, तसेच विविध संघटनांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या निषेधासाठी आयोजित आंदोलनात व निवेदनप्रसंगी अनेक सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याप्रसंगी सकल मराठा समाजातर्फे मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निषेधाचे निवेदन मा. प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांचेमार्फत देण्यात आले.

प्रविण गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून युवकांचे नेतृत्व करत असून, बहुजन समाजातून उद्योजक, समाजहितदर्शी कार्यकर्ते घडवत आणि समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात अशा भ्याड हल्ल्याचा प्रयत्न होणे म्हणजे लोकशाही मूल्यांचा अपमान असून विचारस्वातंत्र्यावर घाला असल्याचा ठणकावून निषेध करण्यात आला.

या हल्ल्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा समाजकंटकांना जरब बसवावी, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या आंदोलन व निवेदनप्रसंगी

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे,
छावा संघटना उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नानासाहेब देशमुख व बाळासाहेब मांजरे,
बळीराजा संघटनेचे भाऊसाहेब सोमासे,
जलहक्क समितीचे भागवतराव सोनवणे,

माजी सरपंच नवनाथ लभडे,
सकल मराठा समाजाचे आंदोलक विजयकांत पठाडे, वाल्मिकराव मगर, रावसाहेब लभडे, छबू सोमासे,
तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांच्या वतीने पुरोगामी चळवळींचा आवाज दडपण्यासाठी अशा भ्याड हल्ल्यांचा वापर केला जात असून, सत्ताधाऱ्यांकडून गुंडांना हाताशी धरून चळवळीतील नेतृत्वावर हल्ले केले जात असल्याचा आरोप स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे यांनी केला.

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी तातडीने आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा पुरोगामी कार्यकर्ते अशा गुंडांचा बंदोबस्त करतील, असा इशाराही सकल मराठा समाजाचे भागवतराव सोनवणे यांनी यावेळी दिला.

“समाजकंटकांना जरब बसवावी, तसेच मराठा समाजाच्या पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची सरकार ने काळजी घ्यावी-” संजय सोमासे. ”

फोटो :- प्रांताधिकारी श्री बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देताना सकल मराठा समाज व स्वारीप चे कार्यकर्ते

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!