नाशिक ग्रामीण

विंचूरमध्ये या व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला! व्यापारी गंभीर, यांनी वार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.५ ऑक्टो २०२५ :- विंचूर येथील प्रतिष्ठित व्यापारी पवन जाजू यांच्यावर शनिवारी सायंकाळी चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोराने पोटावर सलग दोन ते तीन वार केल्याने जाजू गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

या हल्ल्याबाबत जाजू यांच्या कुटुंबीयांनी व्यावसायिक भागीदार मनोज बोराडे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, व्यावसायिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!