लोकल बातम्या

नांदगाव नगरपरिषद २०२५ वार्ड आरक्षण जाहीर

N a n d g a o n N e w s

नांदगाव नगरपरिषद – २०२५ वार्ड आरक्षण जाहीर
वेगवान मराठी : मारूती जगधने
नांदगाव, दि. ८ ऑक्टोबर २०२५

नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदासाठी जागा सर्वसाधारण असल्याने रस्सीखेच निश्चित होणार त्यानंतर नांदगाव नगरपरिषदेसाठी नव्या वार्ड रचनेनुसार आज दि 8 रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. नगर परिषद निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिलांसह सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित वार्ड निश्चित करण्यात आले.

सदर सोडत प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. वार्डनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने संभाव्य उमेदवारांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. काही वार्डांचे आरक्षण बदलल्याने काही ठिकाणी आनंदाचे तर काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नांदगाव नगरपरिषदेच्या २०२५ च्या सर्वसाधारण निवडणुकीसाठी नगरपरिषदेने वार्डनिहाय आरक्षण जाहीर केले आहे.नांदगाव पालिका मुख्याधिकारी शामकांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांसमवेत पार पडलेल्या आरक्षणामध्ये यादी जाहीर करण्यात आली त्यानुसार
या यादीत १० प्रभागांचे २० जागांसाठी आरक्षणाचे प्रकार नमूद करण्यात आले आहेत.

  1. अनुसूचित जाती (महिला): १-अ, ३-अ, ७-अ, ९-अ
    अनुसूचित जमाती: ७-अ
    सर्वसाधारण (महिला): २-ब, ४-ब, ६-ब, ७-ब, ८-ब, ९-ब
    सर्वसाधारण: २-ब, ६-ब, १०-ब
    नागरिकांचा मागासवर्ग प्रर्वा (महिला): ४-अ, ५-अ, १०-अ
    नागरिकांचा मागासवर्ग प्रर्वा: ५-अ, ८-अ, ६-अ
    नगरपरिषदेत निवडणुकीसाठी या आरक्षणानुसार उमेदवार उभे राहू शकतात .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!