नाशिक ग्रामीण

सिन्नर : ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कारवाडी – शहा भागात टॉमेटो – सोयाबीन पुर्ण उद्ध्वस्त…

सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी....

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर :  दि, 27 सप्टेंबर 2025 — राज्यात गेल्या महिनाभरापासून मुसळधार ते अति मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .हातबल झालेल्या शेतकऱ्याला पंचनामाच्या नियमात न अडकवतात आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी व विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी केली आहे . सिन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून रात्रंदिवस पाउस पडत आहे. सुरू असलेल्या पावसाने नदीनाले ओसंडून वाहत आहे .सोयाबीन मक पूर्ण पाण्याखाली गेली असून कारवाडी परिसरात उसाचे पिक उद्ध्वस्त झाले आहे .तर शहा .मिरगाव .पाथरे. पंचाळे. शिंदेवाडी .रामपूर. या भागात टोमॅटो पिकं पाण्यात असून हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने शेतकरी हतबल झाला आहे .आधीच मेटा कुठीला आलेला आहे. प्रचंड खर्च व मेहनतीने पिकविलेला माल काढणीला आला असल्यामुळे शेतकरी स्वप्नांची चादर पाहून बसला होता. परंतु निसर्गचक्रानी सर्व स्वप्नांचा चक्का चूर झाला असून ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी उघडा पडला आहे .अशा अवस्थेत चोहोबाजूंनी पूर्ण आधार गेला असून आता फक्त आधार कार्डच शिल्लक आहे .तर आधार मागायचं कुणाकडे अशा परिस्थितीत शेतकरी संकटाला सामोरे जाताना दिसत आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सरसगट पंचनामे करून फळबागांना एक लाख. सोयाबीन टॉमाटे. तूर .मका .या पिकांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे .राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे की शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात व गाव पातळीवर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने पाहाणी करावे व शेतकऱ्यांना धीर द्यावा राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश काढले असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे सध्या पावसात जोर कमी होत असला तरी पुढील 48 तासात मुसळधार ते अतिवृष्टी  होणार असल्याची शक्यता  तज्ञ हवामान शास्त्रज्ञांनी  व्यक्त केला आहे .

सिन्नर तालुक्यातील पुर्व – पश्चिम भागात पावसाचा हाहाकार…
महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून परतीच्या पाऊस लांबणीवर पडला असल्याने राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी व मुसळधार पावसाने झोडपले आहे.. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे… हतबल झालेला शेतकरी आधार व मदतीच्या प्रतिक्षेत आहेत…
परंतु शासकीय नियम व अटी आणि शर्ती लागू करण्यात वेळ लागतो तोपर्यंत शेतकरी आधाराची वाट पाहाता पाहाता त्यांच्या हातात फक्त कार्ड च शिल्लक आहेत., आधार मागायचा कुणाला…
सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने सिन्नर तालुक्यातील पुर्व पश्चिम भागात पावसाचा धुवांधार कोसळणारा पाऊस सुरू असुन जोर मात्र कायम आहे.. सोयाबीन व मका. कांदा टोमॅटोचे पीक पुर्ण उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी सरकारी मदतीची याचना करीत आहेत….
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्व च भागात पावसाने थैमान घातले आहे.. त्यामुळे नदी नाले व ओढे ओसंडून वाहू लागले आहेत… जामनदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.. वावी ते मिठसागरे रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून धोकादायक प्रवास करत वाहनचालक प्रवास करत आहे…

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!