नाशिक ग्रामीणलोकल बातम्या
नांदगावः पाणी घुसल हो..ये ,पंजाब नाही तो नांदगाव है..

नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा
घरांची पडझड, शेतीचे नुकसान, जनावरे वाहून गेली – प्रशासन सतर्क
वेगवान मराठी : मारूती जगधने
नांदगाव [ दिनांक 28 सप्टेंबर 20 25]
दिनांक 27 आणि 28 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने नांदगाव तालुक्यातील लहान मोठ्या गावांमध्ये नदी नाल्यांना प्रचंड असा पूर आला त्याचे रूपांतर महापुरात झाले त्यामुळे तालुकास्तरावरती विविध गावांमध्ये घरांची पडझड शेतीचे नुकसान जनावरे वाहून गेली असे अनेक घटना प्रशासनाच्या निदर्शनास आले असून प्रशासन या कामी सतर्क झाले आहे तालुक्यात विविध ठिकाणी पंचनामेचे काम सुरू केले आहे या संदर्भातले ग्राउंड रिपोर्ट
पावसाची आकडेवारी
दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी मिळून 136 मि.मी. पाऊस झाला.
आतापर्यंतचा एकूण पाऊस 647 मि.मी. इतका नोंदवला गेला आहे. .
प्रमुख नुकसानग्रस्त गावे व घटनाक्रम
टाकळी बुद्रुक – शेतकरी परसराम दामू शेवरे यांच्या मका पिकाचे वादळ-वाऱ्यामुळे मोठे नुकसान.
मंगळणे – युवराज त्र्यंबक पवार यांच्या शेतातील संपूर्ण घर व पीक पाण्याखाली; जीवितहानी टळली.
वेळगाव – दिनकर टिबा माळी व लक्ष्मण केशरमल माळी यांच्या घरांची पडझड; जीवितहानी नाही.
मनमाड – गुरुद्वारा परिसर, गवळीवाडा भागात घरांमध्ये पाणी घुसून नुकसान.
हिससळ बुद्रुक – प्रकाश रामदास सोनवणे यांची गाय पुर पावसाच्या पाण्यात वाहून गेली.
हिसवळ बुद्रुक – सुधाकर रुंजाजी जगताप यांच्या घराची भिंत कोसळली.
हिसवळ खुर्द – संतोष प्रल्हाद गवंदे यांच्या घराची भिंत पडली; जीवितहानी नाही.
कळमदरी – अलका सुखदेव पगार यांचे घर रात्री कोसळून पडझड.
प्रशासनाची हालचाल
नांदगावचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी आपली टीमसोबत तालुक्यातील विविध भागांची पाहणी केली.
नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल अधिकाऱ्यांना दिले.
शेती, घरांची पडझड व जनावरे वाहून गेल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट.अजून काही गावांचा अंदाज घेणे बाकी आहे जसे अंदाज मिळतील पंचनामे होतील त्या संदर्भात नुकसानीचा आकडा समोर येऊ शकतो .
तालुक्यातील घाटठमा था बोलठाण, जातेगाव, ढेकू, कुसुमतेल, कासारी, नायडोंगरी, पिंपरखेड, परधडी तालुक्याच्या पूर्व भागातील गावे दक्षिणेकडील गावे भालूर, सह लक्ष्मी नगर , मांडवड, फुलेनगर ,श्रीरामनगर या भागांचा देखील अजून पंचनामा होणे बाकी आहे तसेच नांदूर कोंढार भारडी वाखरी या गावांना देखील अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे या सर्व भागातील पंचनामे होणे अजून गरजेचे आहे .



