नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

शांतीबाग परिसरात पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

Nandgaon News

शांतीबाग परिसरात पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

रेल्वे यार्डातून सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे परिस्थिती बिकट

वेगवान मराठी : मारूती जगधने 

नांदगाव (दि. 28 सप्टेंबर 2025) –शहरामध्ये दिनांक 27 सप्टेंबर रोजी झालेला अतिवृष्टीचा फटका नागरी वस्तीमध्ये देखील बसलेला आहे बस स्थानकाच्या बाजूला असलेले पालिका हद्दीतील शांती बाग येथील नागरिकांना पूर पाण्याचा चांगलाच फटका बसलेला आहे .
नांदगाव शहरातील शांतीबाग परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

पाणी येण्याचे प्रमुख कारण .

  • पूर्वेकडील लोहमार्ग यार्ड आणि डुबी परिसरातील पाणी थेट लोहमार्ग पुलातून वस्तीमध्ये शिरले.
  • हे पाणी पहाटे ५ वाजल्यापासून सतत २४ तास परिसरात वाहत आहे.
  • पाणी निचऱ्याचा कोणताही पर्याय नसल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.

प्रभावित भाग

  • भारत गॅस गोडाऊन
  • नूतन कासलीवाल इमारत
  • वामन पोद्दार निवास
  • चंचल गंगवाल निवास
  • देशमुख डेअरी परिसर
  • शर्मा किराणा

नागरिकांचे हाल

  • गल्लीतील सर्व घरे पाण्याखाली, रस्ते बंद.
  • लहान मुलांना घराबाहेर निघणे कठीण झाले.
  • गटारींचे ढापे उघडून पाणी सोडण्याचा प्रयत्न झाला, पण त्यातून निचरा पुरेसा होत नाही.
  • रात्रंदिवस पाणी साचल्यामुळे नागरिक मानसिक तणावाखाली.
  • चिमुकल्यांना खेळण्यावरआणि ज्येष्ठांना .फिरण्यावर अनैसर्गिक रित्या बंदी झालेली आहे .

प्रशासनाकडे अपेक्षा

  • तात्काळ पाणी उपसण्याची व्यवस्था करावी.
  • रेल्वे यार्ड व डुबी परिसरातून येणारे पाणी अडवण्यासाठी कायमस्वरूपी नाले वा बंधारा बांधावा.किंवा मोठी भुयारी गटात उभारण्यात यावी
  • नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेकरिता स्वच्छता व फवारणी मोहिमेची तातडीने अंमलबजावणी व्हावी.
  • शेजारी असलेला चाळीसगाव चांदवड नॅशनल हायवे ला गटारी बांधलेले आहे त्या गटारींच्या पाण्याचा पुरेसा निसर्ग होत नाही आणि त्या गटारीचे पाणी देखील या शांती बागेमध्ये वस्तीमध्ये येऊन पोहोचलेला आहे यादरम्यान घाणकचऱ्यासोबत हजारो काचेचे रिकाम्या बाटल्या देखील या परिसरात येऊन साचल्या होत्या नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने अनेक घाण कचरा उचलून फेकला परंतु गटारीचं घाण पाणी व रेल्वे आरड्यातील बाहेर पडणार पाणी सातत्याने या भागात वाहतच आहे .

एकंदरीत, शांतीबाग परिसरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणी तुंबल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आरोग्यविषयक संकट उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शांती बा वस्ती मध्ये रेल्वे यार्डतून येणार पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिका  ठोस उपाय योजनांची गरज आहे मात्र पालिका प्रशासनातला कोणी अधिकारी किंवा कर्मचारी या भागात फिरकलेला नाहीतसेच स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या भागात दिलसा देण्यासाठी भेटीला गेलेले देखील नाही त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली नागरिकांनी स्वतःहून ढापे उघडून ते पाणी काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पुरेसं यश आलेले नाही .परिणामी 24 तास हे पाणी या ठिकाणी साचतच आहे त्यामुळे चिमुकल्यांच्या खेळण्यावर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फिरण्यावर या ठिकाणी बंदी आलेली आहे त्यांना घरातच थांबून राहावं लागतं .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!