महाराष्ट्र,देश

महाराष्ट्रावर निसर्गाचे मोठं संकट एवढ्या जिल्ह्यामध्ये पुर येणार

वेगवान नेटवर्क / साहेबराव ठाकरे, एकनाथ भालेराव

नाशिक, ता. 28 सप्टेंबर 2024-

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळी ४ वाजता सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिला.

२२ तारखेच्या तडाख्यातून कसाबसा बचावलेला परिसर आता पुन्हा पावसाच्या झोडप्यात सापडला असून, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मका, सोयाबीन, कांद्याची रोपे व लागवड केलेला कांदा पुन्हा पाण्याखाली गेला आहे.

प्रचंड वाऱ्यामुळे मक्याचे पिक जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर मोठे संकट कोसळले आहे. शेतकरी हतबल झाले आहेत.

महाराष्ट्रात पावसाने मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला असून जोरदार पावसामुळे पिके भुईसपाट झाली आहे. पाऊस नाही असे म्हणता म्हणता जोरदार पाऊस पडत असून नाशिक सह अहिल्यानगर,पालघर, ठाणे मुंबई रायगड, पुणे, सातारा या काही भागात पुढील ३.४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून अतिशय_तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, एस.एम.महा., मराठवाडा : मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे.

ही बाईक विक्री करायची आहे. वाकी, ता. चांदवड, नाशिक,- 99223 39357

नाशिक: जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. काही धरणांमधून पाणी सोडण्यात वाढ होत असल्याने, दारणा आणि कडवा नद्या सामान्य पातळीपेक्षा जास्त वाहत आहेत. शहरात अवघ्या १० तासांत ५० मिमी पाऊस पडला.

बागलाण तालुक्यात भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला जखमी झाली. मालेगाव तालुक्यात १६ वर्षीय मेंढपाळ आणि त्याच्या कळपावर वीज कोसळली. दुर्दैवाने, या घटनेत १० मेंढ्यांचा मृत्यू झाला आणि मुलगा गंभीर जखमी झाला.

मुंबईत रात्रभर तुफान पाऊस! दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उपनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरारमध्ये विजांच्या कडकडाटासह रात्रभर पाऊस झाला असून, ६० ते ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईसह कोकणात आजही पाऊस कायम राहणार असून, उद्या ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. उंच लाटांच्या शक्यतेमुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून लांब राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sahebrao Thakare

गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारितेत क्षेत्रात कार्यरत, सकाळ, ॲग्रोवन, साम, देशदूत, पुण्यनगरी, टीव्ही नाईन मराठी,सध्या वेगवान मिडीया ग्रुपचे संपादक म्हणून सध्या कार्यरत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, गुन्हेगारी, टेक्निकल, शेती, व्यवसाय विविध विषयांवर सखोल ज्ञान व लिखाण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!