गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारने त्वरित ” अनुदान ” द्यावे.. खा, राजाभाऊ वाजे — !
गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारने त्वरित " अनुदान " द्यावे.. खा, राजाभाऊ वाजे --- !

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारने त्वरित ” अनुदान ” द्यावे.. खा, राजाभाऊ वाजे — !
सिन्नर : दि . 20 सप्टेंबर 2025 – सध्या महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणींत आला आहे. प्रचंड खर्च व मेहनत घेऊन पिकविलेल्या कांद्याचे भाव पडल्याने, कांद्याने केला वांदा ,,, पिकविलेल्या कांद्याचे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही अशी परिस्थिती कांदा उत्पादक शेतकरयांची झाली आहे. सातत्याने पाठपुरावा करून ही केंद्र सरकार पाहिजे तसा प्रयत्न करत नाही असे दिसते परंतु राज्य सरकारने याबाबत हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या हितासाठी काही महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी वेळ काढूपणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. त्यामुळे शेतकर्याची थट्टा केली जात तर नाही ना याची सल मनात कायम राहिल्याने शेतकरीवर्गात मोठा रोष व्यक्त केला जात आहे.. संकाटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व कांदा पिकाला हमी भाव मिळावा अशी अपेक्षा आहे परंतु सरकार याबाबत मनस्थितीत दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारने याबाबत हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या मालाला अनुदान द्यावे.. अशी मागणी नाशिक चे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. कांद्याला त्वरित अनुदान द्यावे अशी मागणी श्री, वाजे यांनी केली आहे
याबाबत आम्ही विरोधात असलो तरी खासदार सुप्रिया सुळे, भगरे सर, व इतर खासदार आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करत आहोत.. विरोधात असलो तरी चांगल्या कामासाठी सरकारला पाठिंबा आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पिकाला योग्य दर मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला आहे परंतु केंद्र सरकारची उदासीनता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने याबाबत हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पिकाला गुजरात राज्यातील धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे..




