महाराष्ट्र,देश

मक्याचे बंपर आवक होणार – शेतकऱ्यांसाठी हमीभाव खरेदी प्रक्रिया तातडीने सुरु व्हावी

मक्याचे बंपर आवक होणार – शेतकऱ्यांसाठी हमीभाव खरेदी प्रक्रिया तातडीने सुरु व्हावी

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला: दिनांक: 17 सप्टेंबर – येवला तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात मका (मक्याची) पिकाची लागवड झाल्याने बाजारात बंपर आवक होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारभाव आधारभूत किमतीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असल्याने भाव अजूनही घसरणार असा धोका वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर, येवला तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. सुनिल देशमुख यांनी केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भरड धान्याची खरेदी शासनाने तत्परतेने सुरु करण्याची आणि हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी व खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक गोडाऊन व बारदाना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे पणन अधिकारी श्री. बी. आर. पाटील यांना संबंधित मागणीचे पत्र देण्यात आले आहे.

#########

“शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने खरेदी सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे, तरच शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची ई-पीक पाहणी करून नोंदणी करुन घ्यावी.”

सुनिल देशमुख, अध्यक्ष खरेदी विक्री संघ.

***********
शासना कडून अपेक्षा :-
लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी व खरेदी केंद्र सुरु करणे
– हमीभावाने भरड धान्याची खरेदी सुनिश्चित करणे
– शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण करा

येवला तालुका खरेदी विक्री संघ शासनाने तातडीने कृती करावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.

*********

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!