नांदगाव तालुक्यात अपघात एक जण ठार

वेगवान मराठी : मारुती जगधने
22 जुलै 2025
नांदगाव चाळीसगाव नॅशनल हायवे क्रमांक 753 जे वरती नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड नजीक चिंचवीर फाट्याजवळ माल ट्रकने दुचाकी स्वाराला पाठीमागून जबर धडक मारल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन या घटनेत मृत्युमुखी पडला आहे .
घटनेची नांदगाव पोलिसात नोंद करण्यात आलेली आहे . फिर्यादी रवींद्र राजू गांगुर्डे राहणार पिंपरखेड याने पोलीस तक्रारीत म्हटले की ट्रक क्रमांक mh19 झेड 54 49 चालकाचे नाव माहित नाही हा चालक ट्रक दिनांक 21 / 7 /25 रोजी 3:45 वाजता पिंपरखेड शिवारातील चिंचवीर फाटा येथे नांदगाव चाळीसगाव रोडवर सदर चालकाने त्याच्या ताब्यातील मालवाहू ट्रक भरधाव वेगाने अविचाराने रस्त्याच्या कडे कडे दुर्लक्ष करून नांदगाव कडून पिंपरखेड दिशेने जात असताना त्याच दिशेने पुढे जाणारी मोटरसायकल क्रमांक एम एच 41 वाय 96 80 ही स पाठीमागून जबर ठोस मारून त्यावरील दुचाकी स्वार राजीव रतन गांगुर्डे यांना जबर ठोस दिल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे .
नांदगाव तालुक्यातील बातम्या कळण्यासाठी जॅाईन करा व्हॅाटस्अप ग्रुप
सदर मालवाहू ट्रक चालकां ने याबाबत खबर न देता घटनास्थळावरून पळ काढलेला आहे घटनेचा तपास ए एस आय प्रवीण मोरे व पा . ह . बच्छाव तपास करीत आहे या संदर्भात मोटर वाहन कायदा कलम 184, 134, 77 प्रमाणे नांदगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .



