कुंभमेळा पार्श्वभूमीवर येथे रेल्वे टर्मिनस उभारा :- सोनवणे
कुंभमेळा पार्श्वभूमीवर येथे रेल्वे टर्मिनस उभारा :- सोनवणे

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला :- दिनांक 19 ऑगस्ट 2025
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याचे आयोजन होत असून, लाखो भाविकांच्या सोयीसाठी अनकाई अथवा नगरसुल येथे टर्मिनस उभारण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भागवतराव सोनवणे यांनी केली आहे.
या विषयावर सोनवणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी यात विशेष लक्ष घालावे असे ही सोनवणे यांनी म्हटले आहे.
मनमाड–नाशिक दरम्यान वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने सुमारे १३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच नाशिक–त्र्यंबकेश्वर नवीन रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे.
दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांना जोडणारे
येवला तालुक्यातील अनकाई व नगरसुल या स्थानकांचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
दक्षिण भारतातून दौंडमार्गे तसेच छत्रपती संभाजीनगरमार्गे येणाऱ्या लाखो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या दोन्ही स्थानकांचा विकास व विस्तारीकरण तातडीने करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
******************
विद्यापीठ उपकेंद्रांची राखीव जागा वापरा
मंत्री छगन भुजबळ यांनी अनकाई येथे पुणे विद्यापीठ उपकेंद्रासाठी २५० एकर जागा प्रस्तावित केली होती. ही जागा रेल्वे टर्मिनससाठी वापरली, तर प्रवाशांचे नियोजन सुलभ होईल आणि शिर्डी, शनिशिंगणापूर या धार्मिक स्थळांनाही जोडणी मिळून लाखो यात्रेकरूंना फायदा होईल असे ही सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
**********†*
नांदेड रेल्वे विभागाचा मध्य रेल्वेत समावेश व्हावा ही मराठवाडा जनतेची दशकांपासूनची मागणी आजही प्रलंबित आहे. या साठी तसेच टर्मिनस साठी मंत्री भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा :-
– भागवतराव सोनवणे,
सामाजिक कार्यकर्ते तथा राज्य समिती सदस्य, शेतकरी कर्जमुक्ती अभियान
***************
#########
अशा आहेत मागण्या
1. अनकाई अथवा नगरसुल येथे टर्मिनस उभारण्यात यावा.
2. २५० एकर जागा रेल्वेला हस्तांतरित करून तिथे टर्मिनस व सुविधा केंद्र विकसित करावे.
3. दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्यांचे नियोजन या टर्मिनसद्वारे करावे, जेणेकरून प्रवाशांची गर्दी नाशिक शहरात कमी होईल.
4. शिर्डी व शनिशिंगणापूर या धार्मिक स्थळांना रेल्वे मार्गाने जोडणी उपलब्ध करून द्यावी.
5. नांदेड रेल्वे विभागाचा मध्य रेल्वेत समावेश करण्याचा ठोस निर्णय घ्यावा.
#########



