Uncategorized
सुमारे लाखो रुपयांचा अम्लीपदार्थ जप्त मालेगाव पोलिसांची कामगिरी

वेगवान मराठी :मारुती जगधने मालेगाव तालुका पोलीसयांनी मालेगाव नाशिक हायवे रोडवर तीन संशयित आरोपींकडून सुमारे 90 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ युक्त गांजा जप्त करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले .
मालेगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये . चार किलो 456 ग्रॅम वजनाचा गांजा अमली युक्त पदार्थ असे एकूण 89 हजार 120 रुपये किमतीचा गांजा मालेगाव तालुका पोलीस स्टेशन वरीलपोलिसांच्या कामगिरीने कारवाई करण्यात आलेला आहे . या संदर्भाततीन संशयित आरोपींना अटक करण्यात आले घटनेचा पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व त्यांचे सहकारी कसून तपास घेत आहे .
मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोहीम उघडले असून मालेगाव सह नाशिक जिल्ह्यातून अमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून विशेष प्रश्न सुरू आहेत .
या घटनेमध्ये मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने [– गांजा वजन 4 किलो 456 ग्रॅम, एकूण किंमत ₹89,120/-. ]
घटनेचा प्रकार – वरील संशयित आरोपींनी विनापरवाना, बेकायदेशीररीत्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा बाळगल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल अंमलदार – पोना 1262 देवरे
तपास अधिकारी – पो.उ.नि. काळे हे कर्मचारी अधिकारी वरिष्ठांच्या सूचनेनुसार विशेष तपास करीत आहे .
याबाबत सविस्तर असे की मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल
गुन्हा क्र. 605/2025
कायदा – गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम, 1985 चे कलम 8(C), 20(b), 20(B)iiA प्रमाणे.
– दिनांक 09/08/2025 रोजी 15:45 वा. मौजे पाटणे शिवारातील नाशिक ते मालेगाव जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पाटणे फाटा येथे नितीन अशोक सूर्यवंशी यांच्या पडीत शेताजवळ.ही कारवाई करण्यात आलेली आहे .
फिर्यादी – पोलीस हवालदार रतीलाल वाल्मीक वाघ, ब.नं. 2366, मालेगाव तालुका पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण.
आरोपी – संशयीत
. अमजद खान अहमद खान, वय 43 वर्ष, रा. निहालनगर, सर्वे नं. 55, ग. नं. 8, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक.
. अब्दुल रज्जाक सफदर खान, वय 55 वर्ष, रा. अब्बासनगर, सर्वे नं. 164, घर नं. 1, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक.
. फिरोज खान युसूफ खान, वय 30 वर्ष, रा. हिंगलाजनगर, गायकवाड चौक, हलीमा चक्की जवळ, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक.
या संस्थेत आरोपींकडून मिळालेला मुद्देमाल –
.संशयित आरोपी अमजद खान अहमद खान याच्या ताब्यातून निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत खाकी चिगट टेप लावून बांधलेला 2 किलो 131 ग्रॅम गांजा, किंमत ₹42,620/-.
.संशयित आरोपी फिरोज खान युसूफ खान याच्या ताब्यातून निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत खाकी चिगट टेप लावून बांधलेला 2 किलो 160 ग्रॅम गांजा, किंमत ₹43,200/-.
. संशयित आरोपी अब्दुल रज्जाक सफदर खान याच्या ताब्यातून पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत 165 ग्रॅम गांजा, किंमत ₹3,300/-.
या तिघा संशयीतांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या अवैद्य अमली पदार्थांमध्ये
– गांजा वजन 4 किलो 456 ग्रॅम, एकूण किंमत ₹89,120/-.घटनेतील संशय
आरोपींनी विनापरवाना, बेकायदेशीररीत्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा बाळगल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.



