पुणेगाव कालव्याचे पाण्याचे नियोजन कसे होणार -मंत्री भुजबळ
पुणेगाव कालव्याचे पाण्याचे नियोजन कसे होणार - मंत्री भुजबळ

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला: दिनांक: 2 ऑगस्ट 2025
🗣️!जाहीर आवाहन!
येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेतकरी बंधूंनो,
अवघ्या 36 तासांत दरसवाडी धरणातील पाणी 46 किमी प्रवास करून अनकुटे शिवारात पोहोचले आहे. या लाभक्षेत्रातील सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवण्याचे स्पष्ट नियोजन करण्याच्या सूचना *मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेबांनी* प्रशासनाला यापूर्वीच दिलेल्या आहेत.
पाणी सर्वांना मिळणार आहे,हे खात्रीपूर्वक सांगत भुजबळ साहेबांनी आवाहन केले आहे की, कोणीही प्रशासनाच्या परवानगीशिवाय बंधाऱ्यांचे गेट उघडू नये.
पाणी सर्वप्रथम डोंगरगाव येथे पोहोचवले जाईल, त्यानंतर क्रमशः सर्व बंधारे भरत कातरणी परिसरापर्यंत व शेवटी चांदवड तालुक्यातील बंधारे भरले जातील.
आपण सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे व शिस्त पाळावी, हाच आपल्या हक्काच्या पाण्यासाठीचा योग्य मार्ग आहे.
डॉ. मोहन शेलार
पाणी आंदोलक



