नाशिक शहर

नांदगाव तालुक्यात भीषण अपघात, दोन सख्या भावांचा मृत्यू

नांदगाव बोलठाण रोडवरील चांडेश्वरी घाटात अपघात दोन तरुण ठार एक जण गंभीर जखमी

वेगवान मराठी /मारुती जगधने

नांदगाव बोलठाण रोडवरील कासारी गावाजवळील चांदेश्वरी घाटातील हनुमान मंदिरा जवळ झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला या घटनेमध्ये पोलिसांनी ट्रक व दुचाकी ताब्यात घेऊन जखमीस उपचारासाठी दाखल केले आहे .

अपघातामध्ये मयत झालेले दोघेजण सख्खे भाऊ असून ते (अकोले गरदनी )जिल्हा अहिल्यानगर चे .रहिवाशी आहे .याबाबत सविस्तर असे की गॅस सिलेंडर घेऊन जाणारा इंडियन गॅस चा ट्रक ( MT) बोलठाण हून नांदगाव कडे येत असताना व दुचाकीस्वार नांदगाव बाजूकडून बोलठाण बाजूकडे जात असताना इंडियन गॅस च्या ट्रक चा दुचाकी स्वराला जबर धडक बसल्याने दोघेजण घटनास्थळी मृत झाले असून एक गंभीर जखमी झाला . यातील मयत झालेले राहुल बाळू घोडके ( व य 26 )व रोहित बाळू घोडके ( व य 21 )राहणार अकोले गरदनी जिल्हा अहिल्यानगर चे रहिवाशी आहे हे दोघेजण रोजी रोटी साठी शेतमजुरी करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून मामाकडे राहत होते हे आई-वडिलांना दोन मुले होती आणि त्यांचाही अपघातामध्ये मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत त्यांचा मामे भाऊ समाधान गोरख मेंगाळ वय 25 रा कासारी ता . नांदगांव हा गंभीर जखमी झालेला आहे जखमीला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या घटने मयत हे गोरख लक्ष्मण मेंगाळ राहणार कासारी या मामाच्या गावी रोजी रोटी साठी आले होते दिनांक 24 जुलै रोजी सायंकाळच्या दरम्यान इंडियन गॅस गाडी नंबर एम एच 41 ए यु ८५ २५ व दुचाकी नंबर एम एच 41 bq 17 2 3 होंडा मोपेड या दोन वाहनांचा अपघात झालेला आहे दरम्यान दोन्ही वाहने पोलीस स्थानकात जमा करण्यात आलेले आहेत . घटनेचा पोलिसात गुन्हा नोंद करण्याचा काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाळकर हे करीत आहे .

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!