नाशिक ग्रामीण

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

शेतकऱ्यांच देवळा प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्या; शेतकऱ्यांचे देवळा प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

मनोज वैद्य/ देवळा प्रतिनिधी

देवळा तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले शेती पिक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आलेले असुन संपुर्ण देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून तळागाळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी देवळा प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येऊन सदर मागणीचे देवळ्याचे तहसीलदार कुलकर्णी साहेब यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी ग्रामविकास समिती दहिवड अध्यक्ष संजय दहिवडकर, मेशी सरपंच बापूसाहेब जाधव, वाखारी सरपंच मंगेश आहेर, संदीप पवार, लोहणेर येथील समाधान महाजन, विश्वास जाधव, निंबा राघो, त्र्यंबक सोनवणे, अतुल देशमुख, सतिश बोरसे, डाॅ शशांक गुळेचा, शिवाजी निंबा, योगेश पवार, राजेंद्र बागुल आदींसह बहुसंख्य शेतकरी आंदोलन व निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. याबाबत तहसिल कार्यालय व  तालुका कृषी अधिकारी यांनी मागणी वरिष्ठांपर्यंत पोहच करून मागणीनुसार कार्यवाहीचे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!