नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नांदगाव पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षणाचे प्रारूप जाहीर

Nandgaon News

  • नांदगाव पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षणाचे प्रारूप जाहीर

वेगवान मराठी : मारुती जगधने 

नांदगाव (जि. नाशिक) : ॥ दि . १३ ऑक्टोंबर 2025 ॥
नांदगाव पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रियेची सोडत पूर्ण करण्यात आली असून, त्यानुसार आरक्षणाचे प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ नुसार अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि स्त्रिया यांच्यासाठी आरक्षित जागांची निश्चिती करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या सोडतीनुसार आरक्षणाचे प्रारूप निश्चित झाले असून, १3 ऑक्टोबर २०२५ रोजी ही जाहीर सोडत काढण्यात आली. त्यानंतर निश्चित झालेल्या निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची अधिसूचना अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

सदर प्रारूप अधिसूचना जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली असून, याबाबत हरकती व सूचना देण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती अथवा सूचना जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या कार्यालयात निश्चित मुदतीत सादर कराव्यात. मुदत उलटून गेल्यानंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पंचायत समिती निर्वाचक गणाचे क्रमांक व नाव

आरक्षणाचा प्रवर्ग

७१ वेहेळगाव

अनुसूचित जमाती

८० साकोरा

अनुसूचित जमाती स्त्री

८१ सावर्णगाव

नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री

८२ न्यायडोंगरी

सर्वसाधारण स्त्री

८३ पाणवाडी

सर्वसाधारण स्त्री

८४ भालूर

अनुसूचित जाती

८५ मांडवड

नागरिकांचा मागासप्रवर्ग

८६ जातेगांव

सर्वसाधारण

🔹 थोडक्यात:
नांदगाव पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आरक्षणाचे प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!