नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

साकोरा ग्रामपंचायतीच्या जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

Nandgaon News

साकोरा ग्रामपंचायतीच्या जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

वेगवान मराठी : मारुती जगधने 

साकोरा (ता. नांदगाव), “दि. ९ ऑक्टोबर २०२५ ॥

साकोरा ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांच्या खर्चाने राबविण्यात आलेल्या जलजीवन योजनेतील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या संदर्भात नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. ओमकार पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनासोबतच ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेला भ्रष्टाचाराबाबतचा ठराव देखील जोडण्यात आला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, योजनेंतर्गत करण्यात आलेल्या पाइपलाइन, टाकी बांधकाम, पाणीपुरवठा केंद्र या सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून, योजनेच्या गुणवत्तेची कोणतीही तपासणी न करता अंतिम हिशेब मंजूर करण्यात आला.

ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या अनियमितता, निधीचा अपव्यय आणि कामकाजातील त्रुटींची सविस्तर चौकशी होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

या निवेदनावर गावातील अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या स्वाक्षऱ्या असून, प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन न्याय्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!