नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

न्यायडोंगरी उप बाजारात मका लिलाव प्रारंभ

Nandgaon Mews

न्यायडोंगरी उपबाजारात मका लिलावास प्रारंभ

सभापती . दर्शन आहेर यांचे आवाहन – व्यापाऱ्यांनी शिवार खरेदी टाळून लिलावाद्वारेच खरेदी करावी

वेगवान मराठी : मारूती जगधने

नांदगाव ॥, दि. ९ ऑक्टोबर २०२५ ॥
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या न्यायडोंगरी उपबाजारावर मका शेतमालाच्या लिलावाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सभापती इंजि. दर्शन आहेर यांनी व्यापारी बांधवांना आवाहन केले की, शिवारातून थेट खरेदी न करता शेतमालाचा लिलाव उपबाजार आवारातच करावा, ज्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न वाढून न्यायडोंगरी गावाचाही सर्वांगीण विकास साधता येईल.

मका शेतमाल लिलावाचा शुभारंभ गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सभापती . दर्शन आहेर यांच्या हस्ते, तर संचालक दीपक मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सभापती आहेर यांनी यावेळी सांगितले की, न्यायडोंगरी यार्डवर वॉल कंपाऊंड व मुख्य प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात असून, उत्पन्नाच्या प्रमाणानुसार विकासकामे करावी लागत असल्याने सर्व घटकांनी उपबाजाराच्या उत्पन्नवाढीकडे लक्ष द्यावे.

लिलावावेळी मका शेतमालाचे बाजारभाव किमान ₹१५७६ ते कमाल ₹२१५२, सरासरी ₹२०५० प्रती क्विंटल एवढे निघाले.

या प्रसंगी पिंपरखेड येथील शेतकरी भाऊसाहेब बोरसे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला, तर प्रथम खरेदी करणारे राहुल छाजेड (मित ट्रेडिंग कंपनी) यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच व्यापारी असोसिएशन न्यायडोंगरी तर्फे सभापती, संचालक व सचिवांचा सत्कार करण्यात आला

कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक दीपक मोरे, सचिव अमोल खैरनारबाबासाहेब साठेसंजयकुमार बोरसेसुनील पवार, व्यापारी वर्गातील राहुल छाजेड, विजय आहेर, सुमतीलाल दुगड, दत्तू शेवाळे, शोएब तांबोळी, शितल अजमेरा यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!