नाशिक ग्रामीण

उदय सांगळे उद्या भाजपमध्ये, कोण मोहरे लागणार सांगळेंच्या गळाला….

 

 

शरद शेळके /वेगवान न्युज,सिन्नर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिन्नरच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने विधानसभा निवडणूक लढवणारे उमेदवार उदय सांगळे हे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत.

उदय सांगळे यांनी अजित पवार  गटाचे माणिकराव कोकाटेंना टक्कर दिली होती. परंतु विधानसभा निवडणुकींच्या आधी खा.राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्या जोडगोळीत मिठाचा खडा पडला होता. खा .वाजे हे  मागच्या विधानसभेच्या वेळी उदय सांगळे यांच्यासोबत मंचावर दिसत असले तरी राजाभाऊ यांच्या कार्यकर्त्यांसह काही नेत्यांनी जातीय समीकरणांचा विचार करून सांगळे यांच्याशी दगाफटका केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. पराभवानंतर सांगळे यांनी पक्षापासून दूर जात भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुक्यातील राजकीय समीकरणांत झालेले बदल लक्षात घेता अनेक इच्छुक नेते वैयक्तिक पातळीवर रणनीती आखण्याच्या हालचाली करत आहेत. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदांमधील गणित वेगळे असते. येथे प्रबळ दावेदार होण्याबरोबच नेतृत्वाचा पाठिंबा आणि पक्षश्रेष्ठींची मर्जी असणे महत्वाचे ठरणार आहे.

सिन्रर शहरातील आडगाव फाटा मैदानावर उद्या  सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती उदय सांगळे भाजपात प्रवेश करणार आहेत. उदय सांगळे यांच्याबरोबर तालुक्यातील कोणकोणते नेते आता भाजपच्या वाटेवर जाणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!