शिक्षकांची शाळाबाह्य कामे शासनाने कमी करावीत,,, अर्जुन घोडेराव अध्यक्ष येवला तालुका मुख्याध्यापक संघ
शिक्षकांची शाळाबाह्य कामे शासनाने कमी करावीत,,, अर्जुन घोडेराव अध्यक्ष येवला तालुका मुख्याध्यापक संघ

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला दिनांक 3सप्टेंबर – अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संलग्न नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ अंतर्गत येवला तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी निवड दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडली. ही निवड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. प्रदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव श्री. दिपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
या बैठकीत जिल्हा अध्यक्ष श्री. प्रदीप सांगळे यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली.
🔹 अध्यक्ष – श्री. अर्जुन घोडेराव
🔹 कार्याध्यक्ष – श्री. दीपक गायकवाड
🔹 उपाध्यक्ष – श्री. नवनाथ शिंदे, श्री. अरुण पैठणकर
🔹 सचिव – श्री. बाळासाहेब वाबळे
🔹 सहसचिव – श्री. कानीफनाथ मढवई
🔹 खजिनदार – श्री. रविंद्र थळकर
🔹 सहखजिनदार – श्री. सुभाष कानडे
🔹 विद्या सचिव – श्री. रामभाऊ उंडे
🔹 सहविद्या सचिव – श्री. जयंत धात्रक
🔹 अंतर्गत हिशोब तपासणीस – श्री. नंदू भगत
🔹 सह तपासणीस – श्री. मगन वारुळे
🔹 प्रसिद्धी प्रमुख – श्री. अरुण विभुते
🔹 सहप्रसिद्धी प्रमुख – श्री. दिनेश धात्रक
🔹 जिल्हा प्रतिनिधी – श्री. गोरख कुळधर
🔹 महिला प्रतिनिधी – सौ. सुनिता कुलकर्णी
🔹 तालुका प्रतिनिधी – श्री. राजेंद्र पाटील, श्री. अनिल शेलार, श्री. अशोक शेलार, श्री. नागरे, श्री. जंगम
🔹 मार्गदर्शक – श्री. राजेंद्र पाखले, श्री. विजय चव्हाण
ही कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली.
यावेळी राज्य सचिव श्री. एस. बी. देशमुख, जिल्हा अध्यक्ष श्री. प्रदीप सांगळे, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. एस. के. सावंत, जिल्हा सचिव श्री. दिपक गायकवाड, श्री. गोरख कुळधर व श्री. दिगंबर नारायणे यांनी नव्या कार्यकारिणीचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी अध्यक्षपदी निवड झालेले श्री. अर्जुन घोडेराव सर म्हणाले, “शाळाबाह्य कामं शासनाने कमी करावीत ही अपेक्षा आहे, जेणेकरून शिक्षकांना अध्यापनासाठी जास्त वेळ देता येईल.” तसेच मोठ्याप्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी झाली आहे म्हणून शासनाला विनंती आहे की पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द्यावे.



