नाशिक ग्रामीण

धरणे भरली पण तहान नाही भागली

Nandgaon news

 


पाणी आहे… पण आमचे गांव  तहानलेलेच!

वेगवान मराठी : मारुती जगधने

दिनांक [ 4 सप्टेंबर 2025 ]

गिरणा धरण तब्बल ९६ टक्के भरले आहे, माणिकपुंज धरण तर १०० टक्क्यांवर पोहोचले आहे. या दोन्ही धरणांमधून नांदगाव शहराला पाणीपुरवठा होतो. निसर्गाने उदंड पाऊस दिला, धरणे समाधानकारकरीत्या भरली, तरीही नांदगावकर मात्र वग्रामीण भागातील 56 खेडी योजनेवर अवलंबून असलेल्या ना दररोज पाण्यासाठी तहानलेलेच राहतात. धरणांत पाणी आहे, पण नळांत पाणी नाही, ही विसंगती नागरिकांच्या मनातील अस्वस्थता वाढवणारी आहे.

पावसाळ्यात देखील शहरवासीयांना .ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी बारा-पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागते. नियोजनाचा अभाव, यंत्रणेतील ढिसाळपणा आणि जबाबदार अधिकाऱ्यांची बेफिकिरी यामुळे पाण्याचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा होत नाही. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पूरक अशी जलवाहिनी व्यवस्था उभारणे, गळती थांबवणे आणि पाणीपुरवठ्याचे काटेकोर वेळापत्रक तयार करणे हे आजवर कुणीही गांभीर्याने केले नाही.

धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असताना शहर तहानलेले असणे हे प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे. पाणी हा नागरिकांचा हक्क आहे; तो द्यायचा की नाही हा प्रश्न नाही, तर तो वेळेत आणि पुरेसा द्यायचा कसा हा प्रशासनाने सोडवण्याचा प्रश्न आहे.

आज गरज आहे ती केवळ धरणे भरण्याची नाही, तर नागरिकांचा विश्वास भरण्याची. पाणीपुरवठा हा प्रत्येक घराशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. जर शहराला नियमानुसार, वेळेवर पाणी मिळाले नाही, तर लोकांचा संताप अनावर होणार यात शंका नाही.छप्पन खेड योजनेतील नांदगाव शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे 18 गावे नांदगाव तालुक्यातील तसेच मालेगाव तालुक्यातील इतर गावे या गावांना गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला होता परंतु या सर्व गावांची परिस्थिती गंभीर झालेली धरणात मुबलक पाणी आहे .पण नांदगावकरांना पुरेसे व वेळेत पाणी मिळत नाही पांझन, नांदगांव, पंचायत समिती पंपिंग स्टेशन वरून वेळेत पंपिं ग चा प्रश्न विजेवर मोडती .

शासन, नगरपरिषद ग्रामपंचायन आणि पाणीपुरवठा यंत्रणा यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा धरणे भरली तरी नांदगावकरांची तहान भागणार नाही!


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!