नाशिक ग्रामीणमहाराष्ट्र,देश

आरक्षणासाठी मुंबईत मराठ्यांची एकजूट !

Mumbai Vishesh news

 

आरक्षणासाठी मुंबईत मराठ्यांची एकजूट !

 

वेगवान मराठीः मारुती जगधने

मुंबई : विशेष : – [ दि . 1 सप्टेंबर 2025 ]

मुंबई :
आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.

रेल्वे स्थानकांपासून रस्त्यांपर्यंत आंदोलकांनी ठाण मांडले असून, काही ठिकाणी कुस्तीचे फड रंगले, रस्त्यांवर क्रिकेट-कबड्डीचे सामने सुरू झाले, तर हलगी-ताशांच्या गजरात शहर दुमदुमले आहे. खोखो कवायत सूर्यनमस्कार नाच गाणे करमणुकीसाठी सूर्यनमस्कार तसेच वाहतूक जाळीवर गोळा करून बसून त्याच्यावर खेळणे अनेक ठिकाणी आंदोलन निद्रिस्त आहेत काहींनी तर एटीएम सेंटरमध्ये स्थान मांडले आहे .

पाण्याचे टँकर उभे करून स्नानाची सोय करण्यात आली असून, अनेक रस्ते आंदोलकांच्या उपस्थितीमुळे तात्पुरते मैदानात रूपांतरित झाले आहेत.

मुंबईत सध्या मराठा समाजाचा जनसागर उसळला आहे. आंदोलकांचा उत्साह पाहता ही लढाई फक्त आरक्षणापुरती मर्यादित नसून, समाजाच्या आत्मसन्मानाची झाली आहे, हे स्पष्ट दिसते. आझाद मैदान हा या चळवळीचा केंद्रबिंदू ठरत असताना सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

दुर दृष्टिकोनातून पाहिले तर, महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय इतिहासात आरक्षणाचा प्रश्न हा केवळ कायदेशीर तरतुदींचा विषय नाही, तर तो न्याय, समतेची हमी आणि समाजाच्या व्यापक विश्वासाचा प्रश्न आहे. जरांगे पाटलांचे उपोषण आणि लाखोंच्या संख्येने उसळलेला जनसागर सरकारला केवळ निर्णय घ्यायलाच भाग पाडणार नाही, तर पुढील काळात समाजाच्या असंतोषाला कोणती दिशा मिळणार यावरही निर्णायक ठरणार आहे.

आजची परिस्थिती हे दाखवून देते की केवळ तात्पुरत्या आश्वासनांनी ही लाट शांत होणार नाही. शासनाने ठोस धोरणात्मक निर्णय घेऊन, संवादाचा पूल बांधून समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे. अन्यथा आंदोलनाचा हा आवाज केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो.

मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे अनेक लोक आंदोलकांसाठी खेडेगावातून शिदोरी घेऊन मुंबई शहरात पोहोचत आहे लाखोच्या संख्येने भाकरी भाजी चटणी मिरची घेऊन आंदोलन मुंबईमध्ये सरसवले आहेत अनेक आंदोलकांना स्नानासाठी पाणी न मिळाल्याने त्यांनी बिसलरीच्या पाण्याने स्नान देखील केले आहेत आंदोलकांचे अनोखे प्रकार मुंबई शहरात बघायला मिळत आहे कालांतराने हळूहळू मुंबई लोकांनी व्यापली जाणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुंबई सुटणार नाही असा निर्धार जरांगे पाटला सोबतच आंदोलकांनी देखील केलेला आहे .

शासनासाठी ठोस पावले
कायदेशीर व घटनात्मक मार्ग स्पष्ट करणे – आरक्षणासाठी कोणता घटनात्मक मार्ग शक्य आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयीन मार्गदर्शन घेऊन त्वरित भूमिका जाहीर करणे.
तात्काळ अंतरिम उपाययोजना – शिक्षण व नोकरीतील मराठा उमेदवारांसाठी विशेष आर्थिक मदत व शिष्यवृत्ती योजना जाहीर करून तातडीचे दिलासा पॅकेज लागू करणे.
संवाद यंत्रणा मजबूत करणे – आंदोलनाचे नेते, तज्ज्ञ व शासन प्रतिनिधींचा संयुक्त स्थायी समन्वय समिती तयार करणे, ज्यामुळे गोंधळ व अविश्वास दूर होईल.
समाजाच्या सर्वांगीण विकासावर भर – केवळ आरक्षण नव्हे तर रोजगारनिर्मिती, शैक्षणिक सुविधा व उद्योगधंद्यातील संधी वाढविण्यासाठी मराठा समाजासाठी दीर्घकालीन धोरण आखणे .
सध्या मुंबई मधील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे आंदोलकांनी वाहतूक सुरळीत करणे दुहेरी मार्गाचा वापर करावा असे वाहन स्थानिक पोलिसांकडून करण्यात येत आहे .

दरम्यान मुंबई येथील
ए मी फाउंडेशन चे कैलास खांडबहाले यांनी फाउंडेशन च्या वतीने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे . त्याची सुनावणी झाल्यानंतर याचिकेतील निकाल कळू शकतो सदर आंदोलनामुळे मुंबई शहर पूर्णपणे ठप्प झाले असून मुंबई शहरातील वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात झालेले आहे वाहतुकीचा ताण मोठा पोलिसांवर झालेला आहे आंदोलक वेगवेगळ्या पद्धतीने करमनुकीचे खेळ खेळत आहे . आणि तेही रस्त्यावर करत आहे त्यामुळे आंदोलनाची दिशा दिवसेंदिवस बदलत आहे आणि वाढत आहे .
मराठा आंदोलकांनी मुंबई अडून ठेवल्याचा आरोप मुंबईकर करत आहे आदेशाचे आंदोलकांकडून उल्लंघन झाल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!