नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

चाळीसगाव–चांदवड राष्ट्रीय महामार्ग ७५३ ची दुरवस्था; सुरक्षेचा बोजवारा, नागरिक संतप्त

nandgaon news

चाळीसगाव–चांदवड राष्ट्रीय महामार्ग ७५३ ची दुरवस्था; सुरक्षेचा बोजवारा, नागरिक संतप्त

वेगवान मराठी : मारुती जगधने

दिनांक 10 जून 2026

चाळीसगाव–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर सध्या अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून मार्गाच्या सुरक्षेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. तर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि प्रवासी यांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग आणि रस्ता ठेकेदाराकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर पडलेली झाडे, खड्डे आणि दुर्लक्षित देखभाल यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून अनेक वाहनांचे नुकसान होत आहे.

याशिवाय महामार्गावरील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर बनते. अंधारात खड्डे आणि रस्त्यावर पडलेली झाडे दिसत नसल्यामुळे मोठ्या अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.

नागरिकांच्या मते, संबंधित रस्त्याच्या ठेकेदारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. “आले मना तेथे कोणाचे काही चालेना” अशी परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्याच्या देखभाल व सुरक्षेबाबत ठेकेदाराकडून होत असलेल्या हलगर्जीपणाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी काटेरी झाडे त्याचा मार्ग देखील प्रवाशांना बसतो. या रस्त्यावरील झाडांना चेंबर देखील पाणी टाकण्यात आले नाही त्यामुळे रस्त्याच्या दुभाजकांमध्ये एक वृक्ष वेली सुकली आहेत .

प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर पडलेली झाडे हटवावीत, खड्ड्यांची दुरुस्ती करावी, बंद पथदिवे सुरू करावेत आणि महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!