दूध भेसळ मोडीत काढण्यासाठी प्रशासन आक्रमक व्हावे. भाऊसाहेब बैरागी यांचा एल्गार… मुख्यमंत्र्यांना निवेदन – आज तुकाराम मुंढे यांना भेटणार
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
*दुध भेसळ मोडीत काढण्यासाठी प्रशासन आक्रमक व्हावे: भाऊसाहेब बैरागींचा एल्गार*
*मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन, आज तुकाराम मुंडेंची भेट घेणार*
-
*सिन्नर, / नाशिक :* दि ; 10 जून 2026 — सिन्नर तालुक्यातील दुध भेसळीविरोधात लढा उभारणारे ‘दुध भेसळ मुक्ती योद्धा’ भाऊसाहेब नरहरीदास बैरागी यांनी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेऊन भेसळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी काल मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई येथे जाऊन सविस्तर निवेदन सादर केले. आज ते थेट IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती देणार असल्याचे बैरागी यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले. “लढा सुरूच राहणार”, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
*निवेदनातील प्रमुख मुद्दे : ‘स्त्रोत शोध व उत्तरदायित्व’ प्रणालीची मागणी*
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात बैरागी यांनी दुध व दुग्धजन्य पदार्थांमधील जीवघेणी भेसळ रोखण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत :
1. *आवक-जावक परिमाण पत्रक बंधनकारक करा* : राज्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, मनपा हद्दीतील दुध संकलन केंद्रे, संघ, कारखाने व हलवायांनी दर 10 दिवसांनी – म्हणजे महिन्याच्या 10, 20 व 30 तारखेला – खरेदी केलेले दुध व विक्री केलेले दुध/दुग्धजन्य पदार्थ याचे ‘रजिस्टर्ड आवक-जावक विवरण पत्रक’ स्थानिक स्वराज्य संस्थेत सादर करणे बंधनकारक करावे.
2. *’केमिकल गणित’ पकडले जाईल* : जर एखाद्या केंद्राकडे 1,000 लिटर दुध जमा झाले असेल आणि ते 1,500 लिटर विकत असतील, तर मधले 500 लिटरचे ‘केमिकल गणित’ तात्काळ पकडले जाईल, असा दावा बैरागी यांनी केला.
3. *कायदेशीर आधार* : भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 21, अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, भारतीय न्याय संहिता 2023 व सर्वोच्च न्यायालयाच्या 2016 च्या निर्देशांचा हवाला देत भेसळ हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
*भेसळीचे गंभीर दुष्परिणाम*
बैरागी यांनी निवेदनात म्हटले आहे की, युरिया, डिटर्जंट, स्टार्च, मेलोमाईन व फॉर्मेलिन सारखी घातक रसायने वापरून दुधात भेसळ केली जाते. यामुळे बालकांचे यकृत, स्वादुपिंड निकामी होत असून कर्करोगाचा धोका वाढत आहे. WHO च्या इशाऱ्यानुसार हे ‘संथ विष’ आहे. तसेच बनावट दुधामुळे प्रामाणिक शेतकऱ्याला रास्त भाव मिळत नाही व तो देशोधडीला लागत आहे.
*पुढील इशारा*
“जनहितार्थ मागणीवर शासनाने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर लाखो नागरिकांच्या आरोग्यासाठी व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल”, असा इशारा बैरागी यांनी दिला आहे. मुख्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, दुग्धव्यवसाय मंत्री, नगरविकास व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.
दूध भेसळ मोडीत काढण्यासाठी प्रशासन आक्रमक व्हावे. भाऊसाहेब बैरागी यांचा एल्गार… मुख्यमंत्र्यांना निवेदन – आज तुकाराम मुंढे यांना भेटणार —-
*संपर्क : भाऊसाहेब नरहरीदास बैरागी*
रा. पांगरी बुद्रुक, ता. सिन्नर, जि. नाशिक
मो. 9359444203
The administration must take a tough stance to stamp out milk adulteration. Bhausaheb Bairagi issues a strong call to action; memorandum to be submitted to the Chief Minister—meeting with Tukaram Mundhe today.
—



