लोकल बातम्या

नांदगाव शहराच्या वतीने रेल्वे महाप्रबंधकांना निवेदन;

Nandgaon News

वेगवान मराठी : मारुती जगधने

दि १७ जानेवारी २०२६

नांदगाव शहराच्या वतीने रेल्वे महाप्रबंधकांना निवेदन;

भुयारी मार्ग व रेल्वे थांब्यांसंदर्भात महत्त्वाच्या मागण्या

नांदगाव (जि. नाशिक) शहरातील विविध रेल्वेसंबंधित समस्यांबाबत आमदार सुहास कांदे यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक (General Manager) विवेककुमार गुप्ता यांना निवेदन देऊन त्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली आहे. हे निवेदन आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रेल्वे महाप्रबंधक यांच्या प्रतिनिधींना सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नांदगाव शहरातून रेल्वे लाईन गेल्यामुळे शहराचे दोन भाग झाले आहेत. या दोन भागांना जोडणाऱ्या सध्याच्या भुयारी मार्गाबाबत अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्याचा अंडरपास अत्यंत लहान असल्याने वाहतुकीची सतत कोंडी होते. तसेच या मार्गात कायमस्वरूपी पाणी साचलेले असते. पावसाळ्यात तर हा भुयारी मार्ग पूर्णपणे बंद होतो, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर सध्याच्या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करावे, शहराच्या दोन भागांना जोडण्यासाठी स्वतंत्र पादचारी सबवे (Subway) उभारावा, तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याचबरोबर कोरोना काळापूर्वी नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबत असलेल्या काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे थांबे सध्या रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, हे थांबे पुन्हा सुरू करण्याची मागणी आमदार कांदे यांच्या वतीने केली आहे. त्यामध्ये
पुणे–जम्मूतावी झेलम एक्सप्रेस (११०७८ UP / ११०७७ DN),
लोकमान्य टिळक–शालिमार एक्सप्रेस (१८०३० UP / १८०२९ DN),
अमरावती–पुणे एक्सप्रेस (११०२५ UP / ११०२६ DN),
अमृतसर–नांदेड सचखंड एक्सप्रेस (१२७१६ UP / १२७१५ DN)
या गाड्यांचा समावेश आहे.
हे निवेदनावर . आमदार सुहास कांदे  ,अमोल नावंदर, स्वाती नावंदर (गटनेत्या), उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, प्रकाश शिंदे, गणेश पवार, दत्तात्रय आवारे, सुनील जाधव (शहर अध्यक्ष) आणि तुषार पांडे (प्रवासी संघटना अध्यक्ष) यांचा समावेश आहे.
नांदगाव शहराच्या पायाभूत सुविधा आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हा अधिकृत पाठपुरावा करण्यात आला असून, रेल्वे प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्यास नांदगाव परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!