नाशिक ग्रामीण

अंकाई किल्ला चकाचक; शिवजयंती उत्सव समिती व तरुण गणेश मित्र मंडळ परिवाराने राबवली स्वच्छता मोहीम

अंकाई किल्ला चकाचक; शिवजयंती उत्सव समिती व तरुण गणेश मित्र मंडळ परिवाराने राबवली स्वच्छता मोहीम

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला :दिनांक :24 :ऑक्टोबर /येवला तालुक्यातील पाटोदा येथील शिवजयंती उत्सव समिती व तरुण गणेश मित्र मंडळ पाटोदा या संस्था दुर्गसंवर्धनाचे कार्य करीत आहे.

या संस्थेने येवला तालुक्यातील अंकाई येथील अंकाई किल्ला येथे स्वछता मोहीम घेत समाजापुढे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.

किल्ल्यावर जमा होणारे प्लास्टिक रॅपर, दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या या सारख्या निसर्गाला हानी पोहोचवणार्‍या गोष्टी कुठंतरी गडकिल्यांच्या अस्तित्वावर घाला घालत आहेत.

ते थांबवून नवीन पिढीला आपल्या पूर्वजांच्या देदीप्यमान इतिहास बघता यावा यासाठी ‘ शिवजयंती उत्सव समिती व तरुण गणेश मित्र मंडळ परिवार कायम प्रयत्नशील आहे.

त्याप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत गडकिल्ल्यावर स्वछता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!