क्राईम न्यूज : सिन्नर तालुक्यातील तीन तोळ्याची सोन्याची पोत कोणाची पळवली… !
बिबट्या व चोरांचा सुळसुळाट वाढला... बंदोबस्त करावा यासाठी...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर दि, 16 सप्टेंबर 2025 — एकीकडे बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना दुसरीकडे मात्र चोरांचा सुळसुळाट वाढला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या सर्व प्रकारच्या घटनां कडे गांभीर्याने दखल लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण तालुक्यातील मध्यवर्ती बसस्थानकावर दिनांक 14 सप्टेंबर रोजी किरण जगन्नाथ लोणे . जी.एम.डी.काल सेंटरच्या मागे द्वारका नगर येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील तिन तोळ्याची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने पळवली आहे.. सदर प्रकार रविवारी सकाळी दहा वाजता प्रवासादरम्यान सिन्नर बसस्थानकावर घडला.. या संदर्भात सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गु.रजि.नं. 566 / 2025 भारतीय न्या.संहिता 2023 चे कलम ( 303 ) 2 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे.. परंतु या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीचा शोध घेत असून चोरी करुन फरार आहे परंतु सिन्नर पोलिस या आरोपीचा कसुन चौकशी सुरू आहे.. चोराला अद्याप अटक झाली नाही त्यामुळे अशा वारंवार घटना घडु नये यासाठी एस.टि.स्थानकावर पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी तालुक्यातील प्रवासी करत आहे..
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात घरफोडी,लुटमार तसेच जनावरं व शेतातील साठवून ठेवलेला कांदा, सोयाबीनया मालावर डल्ला मारत चोरी करीत आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या प्रकारच्या घटनां कायम सामोरे जावे लागत आहे.. या प्रकारच्या घटनां दिवसेंदिवस वाढतच असून या संदर्भात ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असे मत सुज्ञ नागरिक करत आहेत.



