नाशिक ग्रामीणशेती

नांदगाव शहरात साठ वर्षांतील महाभयंकर पूर कोल्हया नाल्याने धोक्याची घंटा

Nandgaon News

नांदगाव शहरात साठ वर्षांतील महाभयंकर पूर

कोल्हया नाल्याने धोक्याची घंटा

वेगवान मराठी : मारुती जगधने
[दिनांक 28सप्टेंबर 2025 ]
नांदगाव शहरासह मनमाड शहर आणि तालुक्यातील सर्वच भागांमध्ये गेल्या बारा तास सतत पर्जन्यवृष्टी होत असल्याने नदी नाले ओढे हे ओसंडून वाहत आहे त्यामुळे शेती पिकांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी घुसले अनेक घरांमध्ये पाणी घुसले अनेक घरे पाण्यात गेली नांदगाव शहराच्या दर्शनी भागाला असलेल्या हनुमान नगर मध्ये कोल्या नाल्याचे पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले या कोल्या नाल्याला सुमारे दोन तास पाणी उतरले नाही त्यामुळे ट्राफिक जाम झाली होती गेल्या साठ वर्षांमध्ये एवढे पाणी या नाल्याला आले नाही कधी असे ज्येष्ठांकडून सांगण्यात येते भयंकर पूर परिस्थिती असल्याने नागरिक धास्तावले केले .शासनाने पूर परिस्थितीचे अलर्ट केल्यामुळे अनेक नागरिक सावध झाले आत्तापर्यंत जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही .
दरम्यान
  • नांदगाव शहराच्या पश्चिम भागातील कोल्हया नाल्याला प्रचंड पूर आला.
  • हनुमान नगरसह शेकडो घरे पाण्याखाली गेली.
  • कालावती मंदिर व मंमादेवी मंदिर परिसरात सर्व घरे पाण्यात बुडाली.
  • शिवसृष्टी ते न्यू इंग्लिश स्कूल परिसरात पूरपाणी वेगाने वाहत होते.
  • पाण्याला वाट न मिळाल्याने ते थेट इंग्लिश स्कूल मार्गे शाकंभरी नदीच्या पुलाकडे धावले.
  • कोल्या नाल्याला प्रचंड पूर पाणी आल्याने फुलेनगर येथील अनेक घरांमध्ये पाणी घुसले श्रीराम नगर मधील अनेक घरांमध्ये पाणी घुसले
  • कोल्या नाल्याच्या महापुरामुळे फुले नगर पासून ते श्रीराम नगर पर्यंतच्या सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील शेतीची पिके नासाडली तसेच अनेक शेती मातीसहित वाहून गेली
  • कोल्यान आल्यामुळे निकम वस्तीवरील शेती वाहून गेली भाबड बंधूंचे  पीक पाण्याखाली गेली त्यांची पण शेती वाहिली त्यानंतर राऊत बंधू आणि श्रीराम नगर हद्दीतील कोल्या नाल्यावरील बरीचशी शेती पाण्याखाली गेली आणि अनेक शेती खरडून गेली असा भयंकर महा पूर होता याच दरम्यान नाल्या वरील पुरा ने श्रीरां म नगर हाददीत  दोन म्हशी पाण्यात बुडालया होत्या परंतु त्या यशस्वीरित्या बाहेर निघाल्या .

शाकंभरी नदीचा प्रचंड पूर

  • शाकंभरी नदीला मोठा पूर आल्याने शनिमंदिरालगतचे पाणी प्रचंड उसळले.
  • शहरातील . माऊ ली मंदीर जवळील  स्मशान शेड पूर्णपणे पाण्याखाली गेली.
  • संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरावरील पूल, सावता महाराज मंदिराजवळील पूल तसेच  शाकंभरी नदीवरील लो शिंगवे भालूर लक्ष्मीवाडी पाठखान साकोरा ही सर्व केटीवियर  व बंधारे तुडुंब भरून वाहत होती शाकंभरी नदीवरील एकूण तेरा पूल पाण्याने वेढले गेले.

दहेगाव नाका नाल्याचे पाणी शहरात

  • दहेगाव नाका नाल्याचे पाणी शहरात घुसले.
  • गुलजारवाडी, होलारवाडा, जुनी चार नंबर शाळा, पाटील गल्ली, अहिल्यादेवी चौक, भोंगळे रोड या सर्व भागांत पूर पसरला.
  • मुख्य बाजारपेठेतील भेंडी बाजार, कवडे बी भंडार ते महात्मा फुले पुतळा या परिसरात पाणी शिरले.
  • दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान.
  • अब्दुल करीम चाळ तसेच इतर भागा त देखील  पाणी पसरले .

वाहतूक ठप्प

  • कोल्हया नाल्याच्या पुरामुळे शहरात अडीच ते तीन तास वाहतूक पूर्ण ठप्प झाली.

तालुक्यातीलही भीषण परिस्थिती

  • नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत नद्या-नाले ओसंडून वाहिले.
  • शेतपिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

ऐतिहासिक पूर

  • नांदगाव शहरातील हा पूर गेल्या साठ वर्षांतील सर्वात भीषण महापूर ठरला.
  • शहरासोबत तालुकाभरात जनजीवन विस्कळीत झाले.

एकंदरीत:
नांदगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी गेल्या अनेक दशकांत न पाहिलेला हा महापूर अनुभवला. घरे, मंदिरे, पूल, बाजारपेठा आणि शेतीपिके पाण्याखाली गेल्याने जनजीवन ठप्प झाले असून प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!