नाशिक ग्रामीण

गोदावरी कालव्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण चे काम सिन्नरच्या शेतकरयांनी बंद पाडले…

भाजपा चे कार्यकर्ते यांनी दिला सरकारला घरचा आहेर...

वेगवान नाशिक /  भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर ,   दि :  14 ऑक्टोंबर 2025 –गोदावरी उजव्या तट कालव्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचा जो घाट घातला जात आहे. त्याला सिन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे… सिन्नर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी सदर काम बंद पाडले आहे. सध्या या कामाला सुरुवात झाली होती… परंतु शेतकरी व विविध सामाजिक संघटना यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.” आता नाही तर… …. कधी च नाही . ” त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या भाजपा चे कार्यकर्ते यांनी सुद्धा या कामाला विरोध करतांना दिसत आहे.. हा कालवा सिन्नर तालुक्यातील जवळपास दहा बारा गावातील कार्यक्षेत्रातुन जात असल्याने शेकडो एकर जमीन ओलिताखाली येते परंतु सिमेंट कॉंक्रीटीकरण झाल्यावर या सर्व शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असून जमिन कोरडवाहू होऊन शेतकरी रस्त्यावर पडतील अशी भिती निर्माण होईल अशी भावना व्यक्त होत आहेत.. त्यामुळे या कामाला विरोध करतांना कुठल्याही प्रकारची तडजोड न करता भविष्याचा विचार करून या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत संबंधित गावातील ग्रामपंचायतीने ठराव करून सरकारला सादर करून आपला विरोध दर्शवा व आपली बागायती शेती वाचवावी असे आव्हान जाणकार शेतकऱ्यांनी केलं आहे.

       नांदूर मधमेश्वर उजवा तट कालवा वर सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे चालू असलेले विस्तारीकरणाचे काम व कॉंक्रिटीकरण नाला विरोध करून आज काम बंद पाडले त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुकाध्यक्ष कानिफनाथ घुमरे विजय घुमरे सचिन गीते अशोक मवाळ रविराज घुमरे धनंजय जगताप व इतर कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला तरी परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना सूचित करतो की प्रत्येक गावातून ह्या कामाला प्रचंड विरोध झाला पाहिजे आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी या कामाला तिव्र विरोध दर्शविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पुढील आंदोलन करण्याची दिशा ठरविण्यात येईल असे मत भाजपा चे सिन्नर तालुका अध्यक्ष कानिफनाथ घुमरे यांनी व्यक्त केले आहे.
: चोंढी व सांगवी मधून पाटाच्या आस्तारिकरणाला विरोध लक्षात घेऊन ठेकेदाराला त्याचा ढंपर व जे.सी.बी घेऊन पलायन केले असून संबंधित ठेकेदाराने काढता पाय घेतला…

( भविष्यातील असे सिमेंटचे अस्थिर करण झाले तर शेतकरी देशोधडीला लागण्याची भिती…)

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!