नगर परिषदेत प्रथमच महिला गटनेत्या शिवसेना गटनेतेपदी सौ. स्वाती अमोल नावंदर यांची निवड
Nandgaon Mews

नगर परिषदेत प्रथमच महिला गटनेत्या
शिवसेना गटनेतेपदी सौ. स्वाती अमोल नावंदर यांची निवड
वेगवान मराठी : मारुती जाधने
दि . 5 डिसेंबर 2026
नांदगाव नगर परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी नगरसेविका सौ. स्वाती अमोल नावंदर यांची निवड करण्यात आली आहे. नांदगाव नगर परिषदेच्या १०५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या महिलेची गटनेतेपदी निवड झाल्याने हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
ही निवड सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार सुहास कांदे यांच्या शिफारस पत्रानुसार करण्यात आली. नांदगाव नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष. सागर भाऊ हिरे तसेच सर्व नगरसेवकांनी सौ. स्वाती अमोल नावंदर यांच्या नावाची एकमताने शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीस मान्यता दिली.
या निवडीच्या वेळी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
महिला नेतृत्वाला मिळालेल्या या संधीमुळे नांदगाव नगर परिषदेच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



