शहा येथील तरूणाचा तळ्यात बुडून मृत्यू… गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला घडली घटना

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
शहा येथील तरूणांचा तोल गेल्याने तळ्यात बुडून मृत्यू…
सिन्नर: दि. 7 सप्टेंबर 2025 — तालुक्यातील शहा येथील रामा पाराजी कांदळकर याचा ऐन गणेश विसर्जनाच्या पुर्वसंध्येला घराशेजारी असलेल्या तळ्यात तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे त्यामुळे गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे..
श्री, कांदळकर हे गावातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते परंतु रात्र झाल्यामुळे ते घराकडे जायला निघाले परंतु घराजवळच असलेल्या खोल तळ्यात पाय घसरून पडले.. रात्रीच्या अंधारात लक्षात न आल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला.. परीसरातील कुटुंबातील गणपती विसर्जन करण्यासाठी गेले असता त्यांना सदरील प्रकार लक्षात आला.. तात्काळ वावी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु त्यांच्या मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.. रात्री अकरा वाजता या तरुणाचा अंत्यविधी करण्यात आला आहे.. श्री, कांदळकर यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई.वडील असा परीवार आहे…
तसेच तालुक्यातील सरदवाडी येथील तरुणाचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे.. हा तरुण गणपती विसर्जनाच्या वेळी तोल जाऊन पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे.. त्यामुळे तालुक्यांत हळहळ व्यक्त होत आहे..



