महाराष्ट्र,देश

सुमित्रा पवार ” ह्याच राज्याच्या ” उपमुख्यमंत्री ” .. ! उद्या शपथविधी होण्याची शक्यता ; माणिकराव कोकाटे

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर , दि  : 29 जानेवारी 2026 — सुमित्रा ( वहिनी ) पवारच राज्याच्या उपमुख्यमंत्री — माणिकराव कोकाटे..

अजित पवार हाच आमचा पक्ष असल्याने पक्षाचा नेता व नेतृत्व करणारा दुसरा कोणीच नसून फक्त आणि फक्त अजित पवार कुटुंबातीलच व्यक्ती राहतील असा ठाम विश्वास माजी कृषिमंत्री आमदार अजित पवार यांचे खास विश्वासू माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर मध्ये पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या संदर्भात माहिती देताना कोकाटे म्हणाली की आम्ही सर्व 41 आमदार ही अजित पवार यांना मानणारे असून अजित पवार यांच्याकडे पाहूनच यादी अनेक निर्णय घेतले आहे त्यामुळे यापुढेही अजित पवारांची उणीव भरून काढण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच व्यक्ती आम्हाला मान्य असेल त्यासाठी सुमित्रा पवार हेच नाव निश्चित करण्याच्या आम्ही ठरवले असून जेव्हा बैठक होईल तेव्हा हेच नाव उपमुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्यात येईल असा ठाम विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला.
या संदर्भात मी स्वतः सर्व आमदारांना फोन करून प्रत्यक्ष भेट दिली या संदर्भात चर्चा झाली असून सर्वांची हीच भूमिका असल्याने यात नेतृत्वाचा कोणताही दुसरा मुद्दा व चर्चा होऊच शकत नाही व त्या संदर्भात कोणीही पुढे येणार नाही अशी सर्वांनाच खाते आहे त्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न नाही.
शरद पवार गटू अजित पवार गट एकत्र होणार यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना कोकाटे म्हणाली की तो त्यांचा कौटुंबिक अंतर्गत प्रश्न आहे योग्य वेळ आल्यावर अजित पवार कुटुंबातील नेतृत्व सुमित वहिनी जो निर्णय घेतील तो आम्ही सर्व आमदार मान्य करतील. यात शंका घेण्याचं कारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं .
आजची परिस्थिती हे दुःख जनक असून अजून तुम्ही आम्हीच दुःखातून बाहेर निघालो नाही तर अशा वेळेस पवार कुटुंबाच्या परिस्थिती काय असेल यावर विचार त्यांनीच मिठी नाही त्यामुळे नेतृत्व आणि राजकीय विषयावर सध्या आम्ही त्यांच्याशी भाष्य करू शकत नाही परंतु आम्ही सर्व मिळून त्यांच्या नेतृत्वावर एक मुखी विश्वास ठेवल्याने लवकरच बैठक होऊन त्यांचा नावाचा प्रस्ताव आम्ही स्वतःहून मांडणार असल्याने उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून राजकारणात आणि कुटुंबात कायम साथ राहील यातील तिळमात्र शंका नाही.
या संदर्भात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक झाली असून सुमित्रा पवार यांच्या नावाची निवड करण्यात आली असून पवार कुटुंबीयांच्या गोठातून सुमित वहिनींचा होकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.. त्यानुसार उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री म्हणून सुमित पवार यांच्या नावाची निवड जाहीर करण्यात येणार असल्याची अधिक माहिती समोर आली आहे त्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यानी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती हि अधिकृत मानली जात आहे…

मा..मंत्री . आमदार — माणिकराव कोकाटे —-

आमचा तारणहार हरपला… न मागता देणारा आमचा हक्काचा माणूस गमावला आहे…
अत्यंत दुर्दैवी घटना.. अजुन विश्वास बसत नाही… महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची खंत कोकाटे यांनी आपले भावना व्यक्त करताना व्यक्ती केली.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!