शेती

पालखेड कालव्याची गळती तात्काळ थांबवा

पालखेड कालव्याची गळती तात्काळ थांबवा

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
दिनांक : 30 डिसेंबर २०२५

गळती व अवैध उपशांमुळे पालखेड डावा कालव्याच्या येवला तालुक्यातील चारी क्रमांक ३३ ते ५२ अंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० गावांमधील वितरिकांच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही.
त्यामुळे हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाते.
या पार्श्वभूमीवर जलहक्क संघर्ष समितीने संपूर्ण पालखेड कालव्याची गळती व अवैध उपसा तात्काळ थांबवून “टेल टू हेड” पाणीवाटप राबवावे, अशी मागणी जिल्हाधिकारी व पालखेड कालवा प्रशासनाकडे समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास पालखेड लाभ क्षेत्रातील उर्वरित ३८ गावे आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, इशाराही देण्यात आला आहे.
येवला पूर्व 46 ते 52 चारीची गळती बंद झाली असली तरी 1 ते 33 दरम्यान मोठ्या प्रमाणात गळती आणि अवैध उपसा आहे.
फक्त दोन गावांत ८० क्युसेक पाण्याची गळती
कालव्या लगतच्या सर्व जमिनी दीर्घ काळ आवर्तन चालल्या ने उपळून नापिकी वाढली आहे. कालव्याची स्थिरता धोक्यात आली असून पाण्याच्या वहनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यामुळे गळती वाढत असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना व शेतीला बसत आहे.
गळती मुळे चारी क्रमांक ३३ च्या टेल भागालाही सध्या पाणी मिळत नाही. त्यामुळे गेटच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी २० मीटर अंतरावर कालवा अस्तरीकरण करणे आहे.

 

“खरीप हंगामात २५० क्युसेकने सोडलेले पाणी पुढे जाताना अवघे ११० क्युसेकपर्यंत कमी होते. त्यामुळे ४६ ते ५२ वितरिकांना खरीपाचे पाणीही मुबलक मिळत नाही. आम्हाला रब्बी साठीही आवर्तन हवे आहे. बोकटे यात्रेला पाणी हवे आहे. कालवा प्रशासनाने आताच नियोजन करावे.
— भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती, येवला.

*****
पालखेड कार्य कारी अभियंता यांचा

कालव्या ची वहन क्षमता विढविण्या
प्रयत्न आहे. त्या साठी जास्त गळती असलेल्या ठिकाणी कालवा दुरुस्ती सुरु आहे. येवला पूर्व भागात दुरुस्ती झाली आहे. चारी क्रमांक 33 च्या जवळील गळती काढण्याचे काम काही शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.
विशेषतः DY–33 चारीच्या वरच्या बाजूस १ ते १.५ किमी अंतराचे अस्तरीकरण केल्यास सध्या वाया जाणारे ७० ते ८० क्युसेक पाणी वाचू शकते.
:- वैभव भागवत, कार्यकारी अभियंता पालखेड कालवा विभाग.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!