
गावात बिबट्या दिसल्याची माहिती
वेगवान मराठी : दि . 20 नोव्हेंबर 2025
सर्व हिसवळ खुर्द ता. ना. नांदगाव येथील ग्रामस्थांना कळविण्यात येते की, गावात बिबट्या दिसल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे.
दि 20 नोव्हेंबर रोजी मनमाडकडून आपल्या गावाकडे (हिसवळ खु ” )येत असताना
समाधान बाबासाहेब आहेर यांच्या मोटरसायकलसमोरून बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला.
हा प्रसंग दिलीप भाऊसाहेब आहेर यांच्या विहिरीजवळ घडला असून बिबट्या तेथून सुदाम साहेबराव आहेर यांच्या शेताकडे गेल्याचे समाधान यांनी पाहिले.
घाबरल्यामुळे त्यांना फोटो काढता आला नाही, तरीही बराच वेळ निरीक्षण केल्यामुळे बिबट्या असल्याची खात्री झाली आहे.
तसेच, भास्करराव परसराम आहेर यांनीही त्यांच्या घराजवळ बिबट्या दिसल्याची पुष्टी आत्ताच केली आहे. त्यामुळे ही माहिती दुसऱ्यांदा निश्चित झाली आहे. ( सदर माहिती सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे ) या माहिती वरून
सावधानता सूचना
- सर्व ग्रामस्थांनी लहान मुले, जनावरे आणि स्वतःची विशेष काळजी घ्यावी.
- रात्रीच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे.
- आजूबाजूच्या लोकांना जागे करा आणि सावध राहा.
- कोणत्याही हालचालीची माहिती तात्काळ ग्रामपंचायत किंवा संबंधित अधिकाऱ्यांना दयावी



