शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ची हिच योग्य वेळ… खा.वाजे याचे केंद्राकडे साकडे
अवकाळी पावसाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आधार ची आवश्यकता...
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफी हा एकमेव उपाय… कर्जमाफी साठी हिच योग्य वेळ आहे ,,,
Oplus_131072
अवकाळी व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या …. खा. राजाभाऊ वाजे यांची केंद्राकडे साकडे — !
अवकाळी, सततच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल ; केंद्राकडे मांडली समस्या….
नाशिक / सिन्नर ; दि . 31 ऑक्टोबर 20250
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या आणि अवकाळी व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर तीव्र आर्थिक संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेऊन नाशिक जिल्ह्यातील सर्व अवकाळी व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली.
या भेटीदरम्यान मंत्र्यांना सविस्तर अहवाल आणि निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, मे महिन्यापासून जिल्ह्यात पडणाऱ्या जोरदार व अनियमित पावसामुळे कांदा, द्राक्ष, सोयाबीन, भात, मका, टोमॅटो तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके संपूर्ण उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हातात काहीही राहिले नाही.
“नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत दुष्काळ, अवेळी पाऊस, आणि वाढता उत्पादन खर्च अशा अनेक संकटांचा सामना केला आहे. त्यात या वर्षी पिकांचे नुकसान आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. बँकांकडून वसुलीच्या कारवाया सुरू झाल्या असून काही ठिकाणी शेतजमिनींचे लिलावही झाले आहेत. परिणामी, अनेक शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत, ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे.”
या गंभीर स्थितीवर उपाय म्हणून आपण केंद्रीय मंत्र्यांना तात्काळ संपूर्ण कर्जमाफी योजना जाहीर करण्याची मागणी केली आहे. वाजे यांनी मंत्र्यांना सांगितले की, “नाशिक जिल्हा देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. येथे उत्पादित होणारा कांदा आणि द्राक्ष केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशाच्या निर्यात क्षेत्रालाही बळकटी देतात. पण सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संवेदनशीलतेने निर्णय घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात.”
सदर बैठकीदरम्यान कृषीमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण अहवाल मागवून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कर्जमाफी आणि केंद्र सहाय्य पॅकेज तातडीने राबविण्यात आले, तर हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळून नाशिकच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यावेळी खासदार भास्कर भगरे देखील उपस्थित होते

महत्त्वाच्या मागण्या
– पिक विमा दावे तातडीने निकाली काढावेत.
– महाराष्ट्रासाठी NDRF अंतर्गत विशेष केंद्र सहाय्य पॅकेज मंजूर करावे.
– पुढील हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके यावर अनुदान वाढवावे.
– हवामान बदलामुळे वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी दीर्घकालीन कृषी शाश्वतता आराखडा तयार करावा.
मागील ६ महिन्यापासून सातत्याने पाऊस पडतोय, ३-३ वेळा दुबार पेरणी करूनही पीक हाताशी आले नाहीये. याही संकटात ज्यांना थोडे बहुत उत्पादन करता आले त्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये. शेतकरी प्रचंड अडचणीत आलाय. जिल्ह्यासह राज्यात शेतकऱ्यांवर विदारक आर्थिक स्थिती ओढवली आहे. अश्या परिस्थितीत संपूर्ण कर्जमाफी तसेच विशेष पॅकेज देणयात यावी अशी मागणी नाशिक चे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकाद्वारे केली आहे…



