Uncategorizedलोकल बातम्या

लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या नोंदणी चा अडथळा दुर… आंदोलनाला स्थगिती

आवश्यक कागदपत्र प्राप्त झाल्याने मासिक मीटिंगमध्ये याबाबत निर्णय घेतला जाईल..

वेगवान नाशिक  / भाऊसाहेब हांडोरे

         सिन्नर: दि. ऑक्टोबर 2025 —  शहा येथील लिटल फ्लावर स्कूल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वर्ग खोल्याची कागदपत्राची पडताळणी करून नोंद करण्याची ग्रामपंचायत लेखी आश्वासन दिल्याने संस्था चालक विजय घोडेराव यांनी सिन्नर येथील गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुरू केलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे यावेळी शहा ग्रामपंचायत तिच्या ग्रामसेविका शेख मॅडम यांनी आंदोलन करण्याची प्रत्यक्ष भेट घेऊन विजय घोडेराव यांच्या मागण्या समजून घेतल्या व यावेळी नोंदी बाबत अपूर्ण असलेल्या कागदपत्राची पूर्तता झाल्याने येणाऱ्या मासिक मीटिंगमध्ये या विषयावर चर्चा करून सदर स्कूलच्या सर्व वर्ग खोल्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद केली जाईल.

तसेच श्री विजय घोडेराव यांनी ग्रामसेविकेच्या बदली संदर्भात यावेळी कुठलीही मागणी केली नाही व त्यावर कुठेही चर्चा झाली नाही. कागदपत्राची पूर्तता करण्यासंदर्भात श्री घोडेराव यांना यापूर्वीच सांगितले होते परंतु त्यांच्याकडून आवश्यक असणारे कागदपत्र ग्रामपंचायतीकडे न आल्याने सदर नोंदीसाठी अडचण निर्माण होत होती ती आता दूर झाली असून नोंदीबाबत कुठलीही तक्रार नाही… व तसेच माझ्यावर कुठलाही राजकीय दबाव नसून नियमात बसणाऱ्या कामात माझ्याकडून कुठलीहलगर्जी होत नाही त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये. असे स्पष्ट मत ग्रामसेविका शेख मॅडम यांनी वार्ताहरांना शी बोलताना सांगितले.

लिटल फ्लॉवरच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या अकरा वर्ग खोल्याचा ग्रामपंचायतकडे नोंदणी अर्ज सादर केला असता ग्रामपंचायतीने उडवाउडवीची दिले आहे असे संस्थाचालक घोडेराव यांचा आरोप होता. परंतु आवश्यक कागदपत्र न देता नोंदणी करणे व करण्यासाठी असा आग्रहण धरणे योग्य नाही. .कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर ग्रामपंचायत नोंदणी करण्यास केव्हाही तयार होती आणि आजही आहे. .आता आवश्यक कागदपत्र प्राप्त झाल्याने वर्ग खोल्या नोंदणीचा अडथळा दूर झाला असून मासिक मीटिंगमध्ये याबाबत चर्चा करून नोंदणीचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच घोडेराव यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर केलेले आरोप निराधार असून दिशाभूल करणारी आहे. असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे..

वरील मागण्यांसाठी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विजय घोडेराव यांनी  सिन्नर पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केली होते. यावेळी वरील मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे विजय घोडेराव  यांनी सांगितले आहे . त्यामुळे सुरू केलेला आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात येत असून मागण्या ची पूर्तता न झाल्यास जिल्हा परिषद नाशिक यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

 

 

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!