महाराष्ट्र,देश

हवामान खात्याचा मोठा इशारा, सगळीकडे पाणीच पाणी होणार

हवामान खात्याचा मोठा इशारा, सगळीकडे पाणीच पाणी होणार

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव

येवला :दिनांक: 24सप्टेंबर /आधीच अतिवृष्टी ने हैराण झालेल्या महाराष्ट्रासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस म्हणजेच २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी हवामान खात्याने पाच दिवसांचा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात दाब निर्माण झाल्यामुळे आणि अरबी समुद्रातील अस्थिरतेमुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ बंगालपुरता मर्यादित न राहता झारखंड, ओडिशा, कोकण आणि ईशान्येकडील राज्यांवरही होत आहे.

राज्यातील शेतकरी आधीच पुराने आणि अतिवृष्टीने त्रस्त आहेत. त्यात सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतीला आधाराऐवजी अधिक संकटांचा सामना करावा लागत आहे. निसर्गाचा प्रकोप आणि शासनाची उदासीनता यामुळे शेतकऱ्यांची हतबलता वाढत चालली आहे.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!