महाराष्ट्र,देश

जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांचे कोटमगावच्या देवीला शेतकरी कर्जमुक्तीचे साकडे

जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांचे कोटमगावच्या देवीला शेतकरी कर्जमुक्तीचे साकडे

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला :दिनांक :23सप्टेंबर /शेतकरी कर्जमुक्ती अभियान नाशिक चे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी कोटमगावच्या जगदंबा देवीचे दर्शन घेतले.
नाशिक जिल्हा बँकेचा प्रत्येक कर्जदार शेतकरी कर्जाच्या विळख्यातून मुक्त होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट यांच्या कडून जगदंबा देवींची प्रतिमा सोनवणे यांना भेट देण्यात आली.

यावेळी देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते:

अध्यक्ष: श्री रावसाहेब कोटमे

उपाध्यक्ष: श्री भाऊसाहेब आदमने

सचिव: श्री दिलीपराव कोटमे

विश्वस्त: श्री अंबादास लहरे,श्री गणेश कोटमे, श्री लहानू धांद्रे
व्यवस्थापक राजेंद्र कोटमे उपस्थित होते…

🌺 कोटमगावची जगदंबा माता – त्रिगुणात्मक स्वरूप 🌺
जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर असून, यापैकी श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक स्वरूप कोटमगावच्या देवीमध्ये आहे.

प्रसन्न तीन फूट उंचीची शेंदरी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधते.

सप्तश्रुंगी, माहूर व तुळजापूर या तीन क्षेत्राचे उगम स्थान म्हणून कोटमगावची देवी मानली जाते.

भाविकांची गर्दी

नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, बुलढाणा तसेच गुजरातमधून भाविक दर्शनासाठी येतात.

जवळपास २,००० भाविक दररोज घटी बसतात.

सुव्यवस्थित भक्त निवासामुळे भाविकांची संख्या वाढत आहे.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!