महाराष्ट्र,देश

परतीचा पाऊस धिंगाणा घालणार की गुंगारा मारणार

परतीचा पाऊस धिंगाणा घालणार की गुंगारा मारणार

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला :दिनांक :11सप्टेंबर /नाशिक जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून बळीराजांच्या नजरा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत.
खरीप पिकांच्या वाढीला पुरेसा पाऊस झाला असला तरी पुढील रब्बी हंगाम चांगला व्हावा, यासाठी सप्टेंबरअखेरीस व ऑक्टोबरच्या सुरूवातीस अपेक्षित असलेला परतीचा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या काही भागात सध्या पावसाची काहीशी उघडीप जाणवत असली तरी हवामान तज्ञाच्या अंदाजानुसार १३ ते १८ सप्टेंबरदरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

राज्याच्या काही भागात पावसाची उघडीप असली तरी काही भागात पावसाचे प्रमाण अद्यापही टिकून राहणार आहे.
मात्र राज्यात १६ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान तज्ञ व्यक्त करत आहे

तसेच हवामान तज्ञ यांच्या अंदाजानुसार दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीदरम्यानच्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे आणि मान्सून पश्चिम टोक दक्षिणेकडे
सरकल्यामुळे महाराष्ट्रात नव्याने आर्द्रता खेचली जात आहे.

त्यामुळे शनिवार (१३ सप्टेंबर) पासून पावसाला पुन्हा प्रारंभहोईल, असा अंदाज आहे. जिल्ह्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामातील पिकांच्या शेवटच्या टप्प्यातील कामकाजात गुंतलेले आहेत.

मात्र, रब्बी हंगामासाठी आवश्यक आर्द्रता व मातीतील ओल राखण्यासाठी परतीच्या पावसावरच शेतकऱ्यांची आस आहे. जर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला तर गहू, हरभरा,कांदा आदी पिकांची लागवड वेळेवर होईल आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आता पावसाची आतुरतेने वाट पाहत असून परतीच्या पावसावर संपूर्ण रब्बी हंगामाचे भविष्य अवलंबून राहणार आहे.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!