गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाला ठाकरे गटाच्या खासदारांनी दिला बिनशर्त पाठिंबा…
गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाला ठाकरे गटाच्या खासदारांनी दिला बिनशर्त पाठिंबा...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
- सिन्नर / नाशिक : दिनांक, 30 ऑगस्ट 2025 — संपूर्ण देशभर एकच मुद्दा घेऊन सुरू असलेल्या मराठा आरक्षण च्या मागणी साठी संघर्ष योद्धा मराठा आंदोलक मनोज जरागें यांच्या नेतृत्वाखाली अख्खा महाराष्ट्र मुंबईच्या वेशीवर धडाकला या लोखो जनसमुदायाच्या साक्षीने जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र तुन आमदार व विद्यमान खासदार व विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला जात असतांनाच उद्धव ठाकरे गटाचे नाशिक चे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सह नाशिक शहरातील मोठ्या राजकीय लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. या अनुषंगाने आज नाशिक चे खासदार राजाभाऊ यांनी वाजे प्रसिद्धिस पत्रकाद्वारे जाहीर केले.
ठाकरे गटाचे या खासदारांचा ” मराठा आंदोलनला बिनशर्त पाठिंबा “…
गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनास पाठिंबा…
मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा संघर्ष आज पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानावर जनआंदोलनाच्या रुपाने उभा आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे आंदोलन केवळ काही मागण्यांचा उच्चार नाही, तर समाजाच्या अस्तित्वाची व सन्मानाची हाक आहे.
मनोज दादांनी या आंदोलनाला शांतता, संयम आणि सामाजिक सलोख्याचा आधार दिला आहे. महिलांचा सन्मान राखणे, शासकीय संपत्तीचे रक्षण करणे, कायदा हातात न घेणे या त्यांच्या सूचनांमुळे हे आंदोलन लोकशाहीचा आदर्श ठरते.
आज हजारो मराठा बांधव “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणांनी एकवटले आहेत. विशेषतः गरीब कुटुंबांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाने केवळ तात्पुरते आश्वासन न देता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून पुढे पुन्हा आंदोलन करण्याची वेळ समाजावर येणार नाही.
खासदार म्हणून मी या आंदोलनाला पाठिंबा देतो. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण व्हाव्यात, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठीचा हक्क मिळावा आणि समाजाचा आत्मसन्मान अबाधित रहावा, हेच माझे ध्येय आहे.
हा संघर्ष स्वाभिमानाचा..



