नाशिक ग्रामीण
दिंडोरी वणीच्या ग्रामसभेत ठरला हा महत्त्वाचा विषय छोट्या मोठ्यांना दणका

वेगवान नाशिक /सागर मोर
वणी:१४ ऑगष्ट २५ रोजी दुपारी १वाजेच्या दरम्यान घेण्यात आली नेहमी प्रमाणेच अनेक विषयांवर चर्चा झाली परंतु वादळी ठरली ती वणी जुनी ग्रामपंचायत इमारतीला लागुन असलेल्या सभामंडपा बाबत मागील काही दिवसा पुर्वी ग्रामपंचायतीचा असलेला सभामंडप हा देवी मंदिर ट्रस्ट कडे देण्याचा ठराव करण्यात आला होता त्या सभामंडपाचे देखरेख व सर्व जबाबदारी देण्यात आली होती परंतु त्या काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवून ठराव मागे घेण्यास आक्रमक झाले
येथील जगदंबा नगर ग्रामस्थांच्या मते या ठिकाणी सोईसुविधा करून ग्रामपंचायतीने देखभाल करावी जेणे करून गोरगरिबांचे लग्ने या ठिकाणी होतील किंवा सार्वजनिक कार्यक्रमा साठी त्याचा वापर करावा या वरून देवी ट्रस्ट चा ग्रृप व त्याला विरोध करणारा दुस-या गटात चांगलाच कलगीतुरा रंगला होता.
यातुन काहीच निष्पन्न झाले नाही दुसरा अंत्यत महत्वाचा विषय होता तोही अनेक दा ग्रामसभेत आला तो म्हणजे ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या व शासनाच्या असलेल्या जागा भूमिअभिलेख विभागा कडुन मोजणी करून घेणे ही चौथी ग्राम सभा होती यात हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मोजणी साठी सरकारी रक्कम भरली असुन लवकरात लवकर मोजणी होणार असल्याचे
ग्रामपंचायत अधिकारी यांनी सांगीतले परंतु काही ग्रामस्थांनी गावातील सगळ्याच जागा मोजाव्या असा ही आग्रह धरला त्यावर समर्पक चर्चा झाली इतर विषय घेऊन ग्रामसभा उरकती घेण्यात आली.विषेश म्हणजे ग्रामपंचायत सदस्य संख्या १७ असुन त्या पैकी नऊ महिला सदस्य त्या पैकी एक दोन वगळता सर्वच गैहजर
फक्त सरपंच उपसरपंच व पाच ते सहा सहा सदस्य ग्रामसभेला उपस्थित होते.
शहरात काय घडते काय नाही याचे काही सदस्यांना सोयरसुतक नाही शहराच्या काही अडचणी या बाबत चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु विषय वेगळी कडेच भरकटली जाते त्यामूळे सर्व सामान्य वणी कर याकडे पाठ फिरवताना दिसुन आले असेच नेहमी होत राहिले तर ठराविक लोक ग्रामसभेत राहतील त्यांचेच विषय त्यांचेच निर्णय होती ही वणी शहरा साठी धोक्याची घंटा आहे



