महाराष्ट्र,देश

मुसळधार पावसाचा महाराष्ट्राला इशारा

Heavy rain warning for Maharashtra

वेगवान मिडीया / दिपक पांड्या

नवी दिल्ली,ता. 24 जुलै 2025  Heavy rain warning for Maharashtra  महाराष्ट्रामध्ये  मान्सून सक्रिय झाला असून हवामान विभागाकडून एक अपडेट प्राप्त झालेला आहे हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार 24 जुलै रोजी बंगालच्या उत्तर उपसागरावर कमी दाबाचा क्षेत्र जे आहे ते तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे भारतीय हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस मान्सून सक्रिय असणार असल्याचा अंदाज दिलेला आहे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये यामुळे मुसळधार असा पाऊस पडणार आहे महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार ते आपल्याला समजून घ्यायचा आहे.

नाशिक जिल्ह्यातील हवामान अंदाज कळण्यासाठी फॅालो करा या लिंकवरुन चॅनल

भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, महाराष्ट्राच्या कोकण भागात मान्सून सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनच्या हालचालींचा अंदाज वर्तवला आहे.

कोकणातील मान्सूनची परिस्थिती

राज्याच्या हवामान विभागाने पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणच्या काही भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे,

कोकणातील रहिवाशांसाठी सल्ला:

कोकणातील लोकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचा आणि हवामानाच्या सूचनांबद्दल अपडेट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मोठ्या, धोकादायक लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनाऱ्यांना भेट देणे टाळा.

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटी वादळ आणि पाऊस

पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकसह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, ज्यामध्ये ४० ते १२० मिमी दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मान्सून सुरू होताच काही भागात गडगडाटी वादळे आणि विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो. संपूर्ण मध्य महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!