महाराष्ट्र,देश

विष्णू रोकडे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड
वेगवान मराठी :मारुती जगधने दि 13 ऑगस्ट 2026

: पातोंडा(ता. 40गाव) विकास सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी संस्थेच्या कार्यालयात सहकार अधिकारी नितीन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.

या निवडीत चेअरमनपदी विष्णू नामदेव रोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच विजयकुमार रघुनाथ माळी ऊर्फ बालू महाजन यांची सलग तिसऱ्यांदा व्हाईस चेअरमनपदी निवड झाली.

नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे सभापती तात्यासो /संजय भास्कर पाटील यांनी स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोसायटीचे सचिव मोहन सोनवणे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक कौतिक जगन्नाथ माळी (सावता महाराज), श्रीमती सुमनबाई रामदास पाटील, सुधाकर बापूराव देशमुख, राजेंद्र लक्ष्मण धनगर, संजय विठ्ठल अहिरे, सुभाष मांगू माळी, विजय पांडुरंग माळी, विश्वास रामदास माळी, कैलास नामदेव झगडे आदी संचालक व कर्मचारी तसेच गावातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!