Uncategorized

महेश नवमी उत्साहात साजरी; माहेश्वरी युवक मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

Nandgaon News

महेश नवमी उत्साहात साजरी; माहेश्वरी युवक मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

वेगवान मराठी : मारुती जगधने दि 24 Jun 2026

नांदगाव : हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नववा दिवस महेश नवमी अथवा महेश जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान शिव व माता पार्वती यांच्या पूजेसाठी समर्पित असलेला हा दिवस माहेश्वरी समाजाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो. नांदगाव येथे यंदाही महेश नवमी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता श्री व सौ. भूषण सोमानी यांच्या हस्ते महादेवांच्या अभिषेक व पूजनाने झाली. मंत्रोच्चार व धार्मिक विधी मयूर महाराज यांनी संपन्न केले. त्यानंतर माहेश्वरी समाजाच्या वतीने भगवान महेश यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

समाजातील कलंत्री, करवा, फोफलिया, चांडक, सोनी, सोमानी, गांधी, नावंदर, धूत आदी मान्यवर उपस्थित होते. माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी प्रगती मंडळ तसेच युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

महेश नवमीच्या निमित्ताने माहेश्वरी युवक मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी अमित नावंदर यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच सचिवपदी निलेश कलंत्री, उपाध्यक्षपदी अमित चांडक आणि खजिनदारपदी कमलेश फोफलिया यांचीही फेरनिवड करण्यात आली.

यावेळी श्री साईनाथ ब्लड सेंटर, सिन्नर आणि डॉ. अतुल नावंदर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजातील अनेक रक्तदात्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!