लोकल बातम्या

शहा येथे आज मान्यवरांच्या उपस्थितीत ” बुद्ध विहार ” लोकार्पण व बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होणार….

भव्य मिरवणूक व स्नेह भोजन आयोजन...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर दि . 30 एप्रिल 2026 — सिन्नर तालुक्यातील शहा येथे ” नालंदा धम्मचक्र बुद्ध विहार  ” लोक अर्पण सोहळा व बुद्धमूर्ती ची स्थापना आज दिनांक एक मे रोजी मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या आकर्षक वास्तू च्या उभारणीसाठी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष निधीतून खर्च करण्यात आला आहे.. बुद्ध विहार बांधलेल्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न होत असून या कार्यक्रमाचे नियोजन पुर्ण झाले असून . आज शुक्रवार दिनांक एक मे रोजी सायंकाळी सहा ते दहा वाजता बौद्ध मूर्ती मिरवणूक होणार असून त्यानंतर रात्री दहा वाजता भगवान बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे व त्यानंतर भीम गीतांचा महा मुकाबला ( सामना  ) शहा गावचे भूमिपुत्र हल्ली मुक्काम मुंबई . श्री.सुरेश शहाकर विरुद्ध रागिणी मुंबईकर  यांच्यात रंगणार असून या सदाबहार कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती लावावी असे आव्हान कार्यक्रमाच्या नियोजन समितीने केले आहे. यादरम्यान सहा वाजेपासून स्नेहभोजनाचा आस्वाद घेता येईल असल्याचे मा.सरपंच भिमराव जाधव यांनी सांगितले आहे.
या अद्भुत्व पूर्व सोहळ्यासाठी नागपूर येथील भिकू संघाचे भंतीजी माननीय कशापली यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार माणिकराव कोकाटे .

नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. भारत कोकाटे. .इंफ्राचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मेहर खांब . भाजपचे तालुका पदाधिकारी उदय भाऊ सांगळे. सिन्नर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक अनिल भाऊ सरवार. जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे. शहा गावचे लोकनियुक्त सरपंच संभाजी सोपान जाधव यांच्यासह अनेक विचारवंत मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

शहा येथे आज मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्ध विहार लोकार्पण . बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होणार….

 

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!