नाशिक ग्रामीण

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1300 रुपयांपर्यंत भाव

Nandgaon news

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1300 रुपयांपर्यंत भाव
वेगवान मराठी : दि 20 मे 2026
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव येथे बुधवार दि. 20 मे 2026 रोजी सकाळ व दुपार सत्रात उन्हाळ कांद्याच्या लिलावात समाधानकारक बाजारभाव मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजार समितीत कांद्याला किमान 200 रुपये, कमाल 1300 रुपये तर सरासरी 850 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
आजच्या लिलाव प्रक्रियेत एकूण 212 वाहनांमधून कांद्याची आवक झाली होती. विशेष म्हणजे बाजार समितीत आलेल्या सर्व वाहनांचा लिलाव पूर्ण करण्यात आला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
सध्या कांदा बाजारभावात चढ-उतार सुरू असतानाच नांदगाव बाजार समितीत झालेली मोठी आवक आणि संपूर्ण मालाचा झालेला लिलाव याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!