
शरद शेळके ,सिन्नर
सिन्नर पोलीस ठाणे हददीत कोट्यावधी रुपयांचा गुटखा जप्त करण्यास सिन्नर पोलिसांना यश मिळाले आहे.
सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारागाव पिंप्री रोडने मालवाहु ट्रकांमधुन अवैध्य गुटखा वाहतुक होणार असल्याची गुप्त माहीती पोलीस निरीक्षक श्री हेमंतकुमार भामरे, सिन्नर पोलीस ठाणे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ सिन्नर पोलीस ठाणे कडिल अधिकारी व अंमलदार यांचे एक विषेश पथक तयार करुन त्यांना योग्य सुचना व मार्गदर्शन करुन त्यांना सदर कारवाई कामी रवाना केले. सदरच्या पथकाने सिन्नर बारागाव पिंप्री रोडवर सांगळे फार्म हाउस जवळ रोडवर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान दि. १७/०५/२०२६ रोजी सायंकाळी १८/०० वाचे सुमारास निफाड बाजुकडुन सफेद रंगाचा टाटा कंपनीचा एम.एच.४० वाय १९७९ हा कंटेनर व लाल रंगाचा अशोक लेलंड कंपनीचा एम.एच.४० सी.एम.६६१६ अशा दोन संशयास्पद गाड्या मिळुन आल्या. नमुदच्या कारवाईत गाडीवरील चालकांना विचारपुस करुन गाड्या कारवाई साठी ताब्यात घेत असतांना त्यातील एक चालक तेथून पळुन गेला.
त्यानंतर टाटा कंपनीचा एम.एच.४० वाय १९७९ वरिल चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रब्बी अहमद शेख रा. मंगरुळपीर, जि. वाशिम असे सांगितले. सदरची वाहने पुढील तपास कामी पोलीस ठाणेस घेवुन येवुन वाहनांची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात उत्पादन, वितरण व साठ्यास प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पानमसाला, तंबाखु (जर्दा), गुटखा सदृश माल मिळुन आल्याने लागलीच अन्न व औषध प्रशासन नाशिक यांना माहिती देण्यात आली. संबंधीत विभागाकडिल अन्न सुरक्षा अधिकारी श्री. संदिप तोरणे, श्री. अक्षय गाडेकर, श्री. चेतन परदेशी असे पोलीस ठाणेस हजर झाले. संबंधीत अधिकारी यांनी मिळुन आलेल्या सुगंधीत पानमसाला, तंबाखु (जर्दा), गुटखा सदृश मालाचा दोन पंचा समक्ष तपासणी केली असता त्यामध्ये खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आलेला आहे.
६६,००,०००/- बाजीराव BR Gold फ्लेवर पान मसालाच्या एकुण ११० गोण्या.
७६,५६,०००/- नजर पान मसाला व जर्दाच्या एकुण ११० गोण्या.
९,९०,०००/- MASTANI २१६ Premium Chewing Tobaco च्या एकुण ११० गोण्या.
२०,००,०००/- रु. किं टाटा कंपनीचा एम. एच.४० वाय. १९७९ नंबर असलेला कंटेनर ,१५,००,०००/- रु. किं.चा अशोक लेलंड कंपनीचा आयशर एम.एच.४० सी.एम.६६१६ क्रमांक असलेला
१,८७,४६,०००/- असा एकुण रुपये किंमतीचा (एक कोटी सत्याऐंशी लाख शेचाळीस हजार) रुपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांचे पथकाने पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन सिन्नर पोलीस ठाणेस फिर्याद दिल्याने गु.र.नं. ३८९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३,२२३,२७४, २७५, सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३०(२) (a), २६(२) (i), २६ (२) (iv), २७ (३) (d), २७ (३) (e), सह वाचन ३, (i) (zz) (v) प्रमाणे दि. १८/०५/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी नामे रब्बी अहमद शेख रा. मंगरुळपीर, जि. वाशिम यास अटक करण्यात आले असुन मा. न्यायालयाने त्यास ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. श्री. डी. एस. स्वामी, नाशिक ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक श्री अदित्य मिरखेलकर, नाशिक ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, कांतीलाल पाटील, निफाड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार भामरे, पोउनि/अंकुश वारुंगसे, पाहवा/समाधान बोराडे, नितीन डावखर, वराडे, गवंडी, पो. अंमलदार विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, आप्पासाहेब काकड, विलास बिडगर, महेंद्र खामकर,तवर यांचे पथकाने केलेली असुन पुढील तपास पो.नि. हेमंतकुमार भामरे हे करीत आहेत.



