सरपंचपदी सौ. शितल जगधने यांची बिनविरोध निवड
वेगवान मराठी : मारुती जगधने
दिनांक ५ मार्च २०२६
फुलेनगर (ता. नांदगाव) येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. शितल शंकर जगधने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच श्रीमती उषाबाई पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सौ. शितल जगधने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उपस्थित मान्यवर
या निवडीच्या वेळी खालील मान्यवर उपस्थित होते –
रामदास रंगनाथ जगधने – उपसरपंच
मीना सुनिल माळी – ग्रामपंचायत सदस्य
हिराबाई कारभारी माळी – सदस्य
राहुल सोमनाथ गायकवाड – सदस्य
स्वागत व सत्कार
सौ. शितल जगधने यांच्या निवडीनंतर आमदार सुहास कांदे यांनी नवनिर्वाचित सरपंच शितल जगधने यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर शिवसेना ज्येष्ठ नेते विष्णू निकम, माजी सरपंच किसन जगधने, पोपट जगधने तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
निवडणूक प्रक्रियेत अधिकारी उपस्थित
या वेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील मोकळ मोकळ, व निवडणूक अधिकारी तसेच सागर पाटील शिपाई खंडू माळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्यांदाच सरपंचपदी पदी
सौ. शितल जगधने या प्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर आडीच वर्षांतच त्यांना सरपंच पदाचा मान मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
जनहिताच्या कामांना प्राधान्य
नवनिर्वाचित सरपंच सौ. शितल जगधने यांनी सांगितले की, ग्रामपंचायत प्रशासनात पारदर्शकता ठेवून गावातील जनहिताची कामे, पाणी प्रश्न, रस्ते तसेच फुलेनगरमधील महत्त्वाच्या विकासकामांना प्राधान्य दिले जाईल.



